Hardik Pandya, India vs West Indies: वेस्ट इंडिजमध्ये सहा वर्षांनंतर भारतीय संघाला एकदिवसीय सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघाने त्याचा सहा विकेट्सने पराभव केला. शनिवारी (२९ जुलै) विजयानंतर विंडीजने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. आता तिसरा आणि निर्णायक सामना त्रिनिदादमध्ये १ ऑगस्टला होणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील अतिप्रयोग हे टीम इंडियाच्या पराभवाचे कारण असल्याचे मानले जात आहे. या प्रयोगांवर टीका होत आहे, मात्र प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार हार्दिक यांनी त्याचा बचाव केला आहे.

हंगामी कर्णधार हार्दिक पांड्याने खराब फलंदाजीवर पराभवाचा ठपका ठेवला. कर्णधार हार्दिक म्हणाला, आम्ही जशी फलंदाजी करायला हवी होती तशी फलंदाजी केली नाही. पहिल्या सामन्यातील खेळपट्टीपेक्षा आजच्या सामन्यातील खेळपट्टी ही अधिक चांगली होती. यात शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आमच्या सलामीवीरांनी ज्या प्रकारे सुरुवात दिली निश्चितच चांगली होती. विशेषत: इशानने अर्धशतक करत टीम इंडियाला भक्कम पाया रचून दिला होता. मात्र, त्याचा फायदा मधल्या फळीतील फलंदाजांनी उचलला नाही. एवढे असूनही गोलंदाजीत शार्दुलने शानदार खेळी करत संघाला सामन्यात परतण्यासाठी खूप मेहनत घेतली. होप आणि कार्टीने चांगली फलंदाजी करत वेस्ट इंडीजला विजय मिळवून दिला.”

Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
India A Beat India D In Duleep Trophy 2024 Pratham Singh Tilak Varma Score Century Shams Mulani Player of The Match
Duleep Trophy 2024: श्रेयस अय्यरच्या संघाचा दुलीप ट्रॉफीत सलग दुसरा पराभव, शम्स मुलानीच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर इंडिया ए विजयी
Duleep Trophy Ishan Kishan 7th first class century
इशान किशनचे झंझावाती शतकासह निवडसमितीला प्रत्युत्तर; दुलीप ट्रॉफी सामन्यात चौकार-षटकारांची लयलूट
AFG vs NZ Test Match at Greater Noida Stadium Catering Using Washroom Water For Food
AFG vs NZ: टॉयलेटमध्ये धुतली भांडी; नोएडात आदरातिथ्याची लक्तरं; AFG vs NZ सामना होत असलेल्या स्टेडियमधील संतापजनक घटना
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
Babar Azam Retirement From Test Cricket Fake Post Goes Viral on Social Media
PAK vs BAN: पाकिस्तानच्या पराभवानंतर बाबर आझमने कसोटीमधून घेतली निवृत्ती? व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण

हेही वाचा: Virat Kohli: विराट पाणी पाजत राहिला तर रोहितचा पत्ताच नाही, अशी करणार वर्ल्डकपची तयारी? सोशल मीडियावर चाहत्यांचा सवाल

हार्दिक विश्वचषकासाठी तयार नाही का?

सामन्यानंतर हार्दिक म्हणाला, “पराभवाने निराशा आहे, पण खूप काही शिकण्यासारखे होते. सलामीवीरांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे, ते भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचे आहे. इशान किशनने चांगली खेळी खेळली.” आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला सलग दोन सत्रात अंतिम फेरीत पोहचावणाऱ्या कर्णधार हार्दिकने आगामी एकदिवसीय विश्वचषकाबद्दल आपले विचार व्यक्त केले. त्याने २०२२ मध्ये गुजरातला चॅम्पियन बनवले आणि मर्यादित षटकांमध्ये भारताचा पुढील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे.

हेही वाचा: IND vs WI: विश्वचषक न खेळणाऱ्या वेस्ट इंडीजकडून भारताच्या पराभवानंतर राहुल द्रविडचे मोठे विधान; म्हणाला, “रोहित-विराटला विश्रांती…”

एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीबाबत हार्दिक म्हणाला की, “मी सध्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी करत आहे. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मला कामाचा वर्कलोड वाढवावा लागेल. अधिक षटके गोलंदाजी करावी लागेल. सध्याच्या क्षणी मी ससा नाही तर कासव आहे. मात्र विश्वचषक येईपर्यंत सारं काही सुळळीत होईल, अशी अपेक्षा आहे. विश्वचषक सुरु झाल्यावर सर्व काही ठीक होईल अशी आशा आहे.” हार्दिकच्या या वक्तव्यामुळे तो अद्याप वर्ल्डकपसाठी पूर्णपणे तयार नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मालिका आता १-१ अशी बरोबरीत आहे. आता अंतिम सामना निर्णायक ठरणार आहे. पुढचा सामना प्रेक्षकांसाठी खूपच रोमांचक असेल.