IND vs WI Test 2023 2nd Test Day-4 Highlights: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजसमोर ३६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमानांनी २ बाद ७६ धावा केल्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे खंडित झाला. दुसऱ्या सत्राचा खेळ पावसामुळे जवळपास वाहून गेला. अशा स्थितीत पाचव्या दिवशीही खेळ अर्धा तास आधी सुरू होईल. वेस्ट इंडिजच्या आठ विकेट्स घेण्यासाठी भारताकडे जवळपास ९८ षटके बाकी आहेत. तसेच, विंडीजलाही यात २८९ धावा करायच्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना सामना जिंकण्याची समान संधी आहे.

भारताने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव २५५ धावांवर आटोपला. टीम इंडियाला १८३ धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसऱ्या डावात २ बाद १८१ धावा करून डाव घोषित केला आणि एकूण ३६४ धावांची आघाडी घेतली. अशाप्रकारे वेस्ट इंडिजला ३६५ धावांचे लक्ष्य मिळाले. सोमवारी पाऊस न पडल्यास भारत कसोटी मालिका २-० ने जिंकू शकतो. डॉमिनिकामधील पहिली कसोटी टीम इंडियाने एक डाव आणि १४१ धावांनी जिंकली होती.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
West Indies Beat England with New Record of Highest Successful Chase in in T20I At Home Soil of 219 Runs WI vs ENG
ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य

वेस्ट इंडिजचा दुसरा डाव

३६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला पहिला धक्का कर्णधार क्रेग ब्रॅथवेटच्या रूपाने बसला. त्याला रविचंद्रन अश्विनने जयदेव उनाडकटच्या हाती झेलबाद केले. ब्रॅथवेटने तेजनारायण चंद्रपॉलसोबत पहिल्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली. तो ५२ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने २८ धावा करून बाद झाला. यानंतर अश्विनने कर्क मॅकेन्झीला एलबीडब्ल्यू आऊट करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मॅकेन्झीला खातेही उघडता आले नाही. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चंदरपॉल ९८ चेंडूत २४ धावा करून नाबाद असून जर्मेन ब्लॅकवुड ३९ चेंडूत २० धावा करून खेळत आहे. आतापर्यंत दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी झाली आहे.

भारताचा दुसरा डाव

पहिल्या डावात वेस्ट इंडिजला २५५ धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय फलंदाज आक्रमक वृत्तीने मैदानात उतरले. कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी सुमारे आठच्या धावगतीने धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७१ चेंडूत ९८ धावांची भागीदारी केली. कर्णधार रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १६वे अर्धशतक अवघ्या ३५ चेंडूत झळकावले. रोहित ४४ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५७ धावा करून बाद झाला. यशस्वी ३० चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३८ धावा करून बाद झाला.

हेही वाचा: Asia Cup 2023: अजित आगरकरची पारखी नजर! रोहित-द्रविड साथ देणार का? ‘या’ दोन खेळाडूंसाठी BCCI आग्रही

यानंतर शुबमन गिल आणि इशान किशन यांनी ६८ चेंडूत ७९ धावांची नाबाद भागीदारी केली. इशानने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ३३ चेंडूत झळकावले. त्याने एका षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. इशानच्या अर्धशतकासह रोहितने डाव घोषित केला. इशानने ३४ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ५२ धावांची खेळी केली. त्याचवेळी शुबमनने ३७ चेंडूत २९ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून शॅनन गॅब्रिएल आणि वॅरिकन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा: IND A vs PAK A: भारताला अतिआत्मविश्वास नडला! पाकिस्तानने इमर्जिंग आशिया चषकावर कोरले नाव, टीम इंडियाचा १२८ धावांनी दारूण पराभव

पोर्ट ऑफ स्पेन येथे सर्वाधिक यशस्वी पाठलाग (कसोटीमध्ये)

भारत ४०३ वेस्ट इंडीज १९७६

वेस्ट इंडिज २८२ इंग्लंड १९९८

वेस्ट इंडिज २५३ श्रीलंका २००८