Ishan Kishan equals MS Dhoni’s record: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आज त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवला जात आहे. या निर्णायक सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इशान किशन आणि शुभमन गिल या जोडीने शतकी भागीदारी करत शानदार सुरुवात केली. या काळात दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. या दरम्यान इशान किशन मालिकेत सलग तिसरे शतक झळकावत एक विक्रम केला आहे.
इशान किशनचे हे वेस्ट इंडिज दौऱ्यावरील सलग चौथे अर्धशतक आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक आहे. इशानने या मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक ४३ चेंडूत पूर्ण केले. त्याने दुसऱ्या आणि पहिल्या एकदिवसीय सामन्यात आणि त्याआधी दुसऱ्या कसोटीतही अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर इशान किशन ६४ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची खेळी केली. त्याचबरोबर त्याने एमएस धोनीच्या एका विक्रमाची बरोबर केली.
इशानने एमएस धोनीच्या विक्रमाशी केली बरोबरी –
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सलग तिसरे अर्धशतक झळकावल्यानंतर इशानने एमएम धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. इशान आता वेस्ट इंडिजमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक ५० पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने तिसऱ्यांदा वेस्ट इंडिजमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक ५० प्लस धावा केल्या आहेत. हा पराक्रम तीन वेळा करण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. इशान आणि धोनी व्यतिरिक्त पार्थिव पटेल आणि संजू सॅमसन यांनी प्रत्येकी एकदा हा पराक्रम केला आहे.
सामन्याबद्दल बोलायचे तर, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २८ षटकानंतर २ बाद १९२ धावा केल्या आहेत. शुबमन गिल ७० चेंडूत ७५ धावांवर खेळत आहे. त्याचबरोबर संजू सॅमसन २२ चेंडूत २८ धावांवर नाबाद आहे. तत्पुर्वी ऋतुराज गायकवाड ८ धावा करुन दुसऱ्या विकेट्सच्या रुपाने बाद झाला.