Ishan Kishan on Rishabh Pant, IND vs WI 2nd Test: इशान किशन आणि ऋषभ पंत हे भारतीय क्रिकेटचे दोन उगवते तारे आहेत जे त्यांच्या अंडर-१९ दिवसांपासून खूप जवळचे मित्र आहेत. २०१६ अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत दोघांनी मिळून भारताला अंतिम फेरीत नेले होते. आता दोघेही वरिष्ठ भारतीय क्रिकेट संघाचा भाग आहेत. फरक एवढाच आहे की ऋषभ पंतने २०१८ मध्येच कसोटी पदार्पण केले होते, तर इशान किशनला पाच वर्षांनंतर म्हणजेच २०२३ मध्ये ही संधी मिळाली. विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इशानने ऋषभच्या बॅटने आक्रमक फटकेबाजी केली.

वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इशानला कसोटी कॅप मिळाली. त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात आपले कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्या अंडर-१९ विश्वचषकात इशान किशन कर्णधार होता आणि ऋषभ पंत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळत होता. आता काळ बदलला, वर्षे बदलली, यष्टिरक्षक बनले, परिस्थितीने दोघांनाही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनवले, पण जुनी मैत्री आणि ते नाते आजही कायम आहे. सामन्यानंतरच्या एका मुलाखतीत त्याने यारा तेरी यारी को सलाम… असे म्हणत त्याला थॅन्क्यू म्हटले.

nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”
Veteran cartoonist Shi da Phadnis debuting at 100 shared his life journey expressing I wanted to be a Phadnis
‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना
Shiv Pratap Din celebrated at Pratapgad Flowers showered from helicopter on Chhatrapati equestrian statue satara news
अलोट उत्साहात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा; छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव

हेही वाचा: IND vs WI: अश्विन ठरला गेम चेंजर! भारत मालिका विजयापासून केवळ आठ विकेट्स दूर, विंडीजसमोर अजूनही २८९ धावांचे आव्हान

ऋषभ पंतच्या बॅटने अर्धशतक

३१ डिसेंबर २०२२ रोजी उशिरा एका रस्ता अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर ऋषभ पंत टीम इंडियापासून दूर आहे, ज्याचा फायदा इशान किशनला झाला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या इशान किशनला मात्र या संधीचे सोने करता आले नाही. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही तो स्वस्तात बाद झाला, मात्र दुसऱ्या डावात या युवा डावखुऱ्या यष्टीरक्षक फलंदाजाने तुफानी खेळी करताना अवघ्या ३३ चेंडूत पहिले अर्धशतक ठोकले. इशानने लागोपाठ दोन चेंडूत दोन षटकार मारत हा पल्ला गाठला. विशेष म्हणजे त्याने हे अर्धशतक ऋषभ पंतच्या बॅटने ठोकले आणि एका हाताने मारलेले दोन्ही षटकारही त्याला ऋषभ पंतची आठवण करून देत होते.

अर्धशतकानंतर इशानने ऋषभ पंतचे मानले आभार

इशान किशनने ऋषभ पंतचे पहिले कसोटी अर्धशतक झळकावल्यानंतर खास संवाद साधताना त्याचे आभार मानले. बीसीसीआयच्या ट्वीटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तो म्हणतोय, “येथे येण्यापूर्वी मी एनसीएमध्ये सराव करत होतो आणि ऋषभही तिथे रिहॅब करत होता. त्याने मला बॅट पोझिशन आणि इतर गोष्टींबद्दल काही छान सल्ले दिले कारण, त्याने मला बॅटिंग करताना पाहिले होते. आमच्या अंडर-१९ दिवसांपासून आम्ही अनेक सामने एकत्र खेळलो आहोत. त्याला माझी मानसिकता माहीत आहे. मलाही असेच कोणीतरी पुढे यावे आणि माझ्या फलंदाजीबद्दल काहीतरी सांगावे अशी माझी इच्छा होती, म्हणून धन्यवाद ऋषभ, यारा तेरी यारी को सलाम…”

इशानला फलंदाजीत बढती मिळाली

दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माने इशान किशनला फलंदाजीत बढती देत ​​सातव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पाठवले. कारकिर्दीतील तिसऱ्या कसोटी डावात या सलामीवीराने विक्रमी पदार्पण केले. यापूर्वी, रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद अर्धशतकाची भागीदारी नोंदवली. त्याने अवघ्या ५.३ षटकात भारताची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली. त्यामुळे भारताने दुसरा डाव १८१/२ वर घोषित केला आणि विंडीजसमोर ३६५ धावांचे लक्ष्य ठेवले.

Story img Loader