Ishan Kishan on Aakash Chopra: यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनसाठी वेस्ट इंडिज दौरा खूप यशस्वी ठरला. तीनही एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात अर्धशतकांसह, यष्टीरक्षक-फलंदाजाने एका एलिट क्लबमध्ये प्रवेश केला, ज्यात एम.एस. धोनी, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. या दिग्गज फलंदाजांनी देखील सलग एकदिवसीय सामन्यांमध्ये अर्धशतके ठोकली होती त्या यादीत आता इशानचा नंबर लागला आहे. मात्र, त्याला पहिल्या टी२० सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याचा बदला दुसऱ्या टी२० सामन्यात घेतो का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये इशान किशनने अर्धशतक झळकावले. केवळ एकदिवसीयच नाही तर कसोटीतही त्याने अर्धशतक ठोकले. फलंदाजीबरोबरच इशानने आपल्या यष्टिरक्षण कौशल्यानेही सर्वांना प्रभावित केले. विशेषत: तिसऱ्या वन डेत त्याची कामगिरी उत्कृष्ट होती, त्याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Archery WC: जगात भारी महाराष्ट्रीयन नारी! सातारच्या लेकीने एकाच हंगामात दोन विजेतेपद जिंकत रचला इतिहास

चोप्रा आणि किशनचे मजेशीर संभाषण

खरे तर तिसर्‍या वन डेत इशान किशन विकेटकीपिंग करत असताना आकाश चोप्रा त्याच्या स्टंपिंगबद्दल बोलत होता. वेस्ट इंडिजचा फलंदाज स्टंप झाला की नाही हे व्हिडीओ रिप्ले दाखवत होते. दरम्यान, समालोचन करताना आकाश चोप्रा म्हणतो, “जेव्हा तुम्ही स्टंपिंग आणि रिव्ह्यूच्या निर्णयाचे पुनरावलोकन करता तेव्हा फारच कमी वेळा इतका क्लोज डिसिजन येतो”. आकाश पुढे म्हणाला, “मी फलंदाजाचे पाय जमिनीवर पाहत आहे. इशान तू रांचीचा असशील पण तुझे नाव एम.एस. धोनी नाही.” असे म्हणत त्याने इशानला टोमणा मारला.

द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेतील तीनही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावणारा इशान किशन हा नवीनतम भारतीय फलंदाज आहे. स्टंपिंग अपील दरम्यान सामन्यावर समालोचन करणाऱ्या भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांच्याशीही त्याने मजेदार गप्पा मारल्या. त्याच्या या टोमण्याला जशास तसे इशान किशनने प्रत्युतर दिले.

हेही वाचा: IND vs WI: लक्ष्य को हर हाल…! दुसऱ्या टी२० मध्ये कर्णधार हार्दिकला करू शकतो ‘ही’ मोठी कामगिरी, तर बुमराहला ही मोठी संधी

आकाश चोप्रा समालोचन करताना इशान किशन बाबत म्हणाला की, “तुम्ही स्टंपिंग आणि रन आऊटचा रिव्ह्यू घेणे ही गोष्ट फारच कमी वेळा होते. आतापर्यंत तरी तू मला समजूतदार वाटतोस. तुम्ही रांचीचा असाल, पण तुमचे नाव एम.एस. धोनी नाही.” इशानने स्टंप-माइकमधून आकाश चोप्राचे हे शब्द ऐकले आणि त्याला सडेतोड उत्तर दिले, “हो, ठीक आहे मग, नाही आहे मी धोनीभाई.” चोप्राने त्यावर त्याला प्रत्युतर दिले, “इशान किती गोंडस आहे. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो.” या घटनेचा व्हिडीओ स्वतः चोप्राने शेअर केला आहे.

सामन्यानंतर इशान किशन प्रेझेंटेशनमध्ये काय म्हणाला?

‘प्लेअर ऑफ द सिरीज’ घोषित झाल्यानंतर किशन म्हणाला, “मी केलेल्या कामगिरीवर फारसा खूश नाही. सेट झाल्यानंतर मला मोठी धावसंख्या करायची होती. माझ्या वरिष्ठांनी मला तेच सांगितले, मात्र मला अर्धशतकाचे रुपांतर शतकात करता आले नाही. ७०, ८० दरम्यान स्कोअर करून बाद झालो. आता मोठी खेळण्यासाठी अधिक प्रयत्न करेन. या टप्प्यावर सेट अप करणे गरजेचे आहे. शेवटचा गेम विसरणे आणि ० पासून सुरुवात करणे महत्त्वाचे आहे.”