Virat Kohli Catch India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वन डे मालिकेतील पहिला सामना बार्बाडोस येथे खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ प्रथम फलंदाजी करताना ११४ धावांवर गारद झाला. वेस्ट इंडिजच्या डावात विराट कोहलीने अप्रतिम झेल घेतला. त्याने रवींद्र जडेजाच्या षटकात रोमॅरियो शेफर्डचा झेल घेतला. कोहलीच्या या झेलचे खूप कौतुक होत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय चांगलाच ठरला, कारण वेस्ट इंडिजचा संघ केवळ ११४ धावांवर ऑलआऊट झाला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीदरम्यान विराट कोहलीने स्लिपमध्ये पापणी लवते लवते तोच एका हाताने शानदार झेल घेतला होता. वास्तविक, रवींद्र जडेजा १८व्या षटकात गोलंदाजी करत होता. रोमारियो शेफर्ड फलंदाजी करत होता आणि विराट कोहली स्लिपवर उपस्थित आहे. यादरम्यान चौथ्या चेंडूवर किंग कोहलीने सूर मारत झेल घेतला.

IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
anshul kamboj
१० पैकी १० विकेट्स! अंशुल कंबोजचा रणजी स्पर्धेत विक्रम
Arshdeep Singh Becomes India Most Successful T20I Fast Bowler Surpasses Jasprit Bumrah and Bhuvneshwar Kumar with 92 Wickets IND vs SA
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Axar Patel Stunning Catch of David Miller Reminds South Africa T20 World Cup 2024 Suryakumar Yadav IND vs SA 3rd T20I Watch Video
Axar Patel Catch: अक्षर पटेलने टिपला मिलरचा ‘सूर्या दादा स्पेशल कॅच’, सीमारेषेवर हवेत झेल घेत असा फिरवला सामना ; VIDEO व्हायरल
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद

हेही वाचा: IND vs WI 1st ODI: लाइव्ह सामन्यादरम्यान शार्दुल ठाकूर भिडला अंपायरशी, मैदान सोडण्यास दिला नकार; पाहा Video

वास्तविक शेफर्ड वेस्ट इंडिजसाठी ७व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यादरम्यान जडेजाच्या षटक टाकत होता. जडेजाच्या षटकातील चौथ्या चेंडूवर शेफर्ड कोहलीकरवी झेलबाद झाला. हा झेल खूप कठीण होता, पण कोहलीने तो एका हाताने सहजरित्या पकडला. शेफर्ड शून्य धावांवर बाद झाला. कोहलीच्या या झेलचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. त्याच्या चाहत्यांनी या झेलचे अनेक फोटो ट्वीटरवर शेअर केले आहेत.

भारताने पहिला सामना जिंकला

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २२ षटके खेळली. यादरम्यान २३ षटकांत ११४ धावा करून संघ ऑलआऊट झाला. संघाकडून शाई होपने ४३ धावा केल्या. कुलदीपने टीम इंडियासाठी ४ विकेट्स घेतल्या, त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय जडेजाने ३ आणि हार्दिक पांड्या, शार्दुल आणि मुकेशने १-१ विकेट घेत त्याला साथ दिली. त्याचवेळी वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ अवघ्या २३ षटकांत गडगडला आणि भारतापुढे ५० षटकांत ११५ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान पाच विकेट्सच्या मोबदल्यात सहजरीत्या पार केले. टीम इंडियाने हा सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.