India vs West Indies: कॅरेबियन बेटांवर जवळपास एक महिना घालवल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघ यूएसएमध्ये पोहोचला आहे आहे. इथे टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध दोन टी२० सामने खेळणार आहेत. सध्या ते मियामीमधील स्वछ आणि तेजस्वी सूर्यप्रकाशात संघ आनंद लुटत आहे. योगायोगाने, हे तेच शहर आहे जिथे दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या मेजर लीग सॉकर (एमएलएस) क्लबकडून खेळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेस्ट इंडिज विरुद्धच्या चौथ्या टी२० च्या आधी, दौऱ्यावर उपस्थित असलेल्या भारताच्या काही स्टार क्रिकेटपटूंनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) चे नाव ऐकल्यावर त्यांच्या मनात आलेली पहिल्या गोष्टीविषयी बोलले आहे. शनिवारी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे चौथ्या टी२० सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजशी भिडणार आहे. भारताने शेवटच्या सामन्यात पुनरागमन करत सात गडी राखून विजय मिळवला . सध्या मालिका २-१ अशी वेस्ट इंडिजच्या बाजूने झुकलेली आहे.

टीम इंडियाच्या मनात अमेरिकेसाठी आलेला पहिला शब्द

हार्दिक पांड्याच्या मनात यूएसए म्हणताच स्वप्न हा शब्द येतो. तो म्हणतो, “ यूएसए हा असा देश आहे  जिथे जगभरातील लाखो लोक त्यांच्या क्लास, धर्म, लिंग, जात इत्यादींचा विचार न करता तेथे यश आणि पैसा मिळवून ‘अमेरिकन ड्रीम’  साकार करण्याचे स्वप्न पाहतात. त्यामुळे अमेरिका? मला वाटते की अनेकांचे स्वप्न आहे.” वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या मनात यूएसए म्हणताच ज्या गोष्टी/कल्पना येते ती म्हणजे “मियामीतील शॉपिंग.”

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया कपसाठी कॉमेंट्री पॅनेल जाहीर! गंभीर, रवी शास्त्री, वसीम अक्रम यांचा समावेश, ‘या’ स्टार समालोचकला वगळले

अक्षर पटेलला विचारले असता त्याला यूएसए हे नाव ऐकल्यावर त्यांच्या मनात एकच गोष्ट येते ती म्हणजे “गुजराती”. या शहरात बऱ्यापैकी गुजराती लोक राहतात.  युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल म्हणतो, “मला यूएसए म्हणताच त्यांची भावणारी जीवनशैली वाटते.” यूएसएने फिरकीपटू युजवेंद्र चहलला अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर व्हिडीओ गेम मालिका, ग्रँड थेफ्ट ऑटो (जीटीए) ची आठवण करून दिली. GTA मालिकेतील बरेच गेम यूएसए मधील काल्पनिक शहरांमध्ये आधारित आहेत. याबाबत बोलताना तो म्हणतो, “जीटीए. मी जीटीए खेळतो त्यामुळे यूएसए म्हणताच माझ्या मनात तेच येते. “

फिरकीपटू कुलदीप यादव म्हणाला की, “यूएसए हा शब्द ऐकल्यावर त्याला लिओनेल मेस्सीची आठवण येते. “मेस्सी कुठेही जाईल, त्याचे चाहते त्याला फॉलो करतील. मी त्यांच्यापैकी एक आहे, संघातील बरेच खेळाडू त्याचे चाहते आहेत.” मेस्सीने अलीकडेच मेजर लीग सॉकर क्लब इंटर मियामीमध्ये प्रवेश केला, जी यूएसए मधील फुटबॉल लीग आहे. यूएसए हा शब्द ऐकल्यावर स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला ‘आईस्क्रीम आणि माझे आवडते चीजकेक’ ची आठवण होते. “फिटनेसमुळे आता ते खाऊ शकत नाही,” अशी खंत सूर्याने व्यक्त केली.

हेही वाचा: IND vs PAK: विश्वचषकात पाकिस्तान संघाला विशेष वागणुकीवरून परराष्ट्र मंत्रालयाचे सडेतोड उत्तर; म्हणाले, “त्यांनाही इतर…”

यूएसए हा शब्द ऐकल्यावर इशान किशनच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे “आर्द्रता, उष्णता आणि मला त्यांच्यापासून दूर राहायचे आहे,” अशी त्याने टिप्पणी केली. यूएसए हा शब्द ऐकला की फलंदाज शुबमन गिलला त्याच्या नातेवाईकांची आठवण येते.  तो म्हणाला की, “मी पंजाबी आहे, माझे बरेच नातेवाईक इथे आहेत. त्यामुळे माझ्या मनात ही पहिली गोष्ट येते.”

आवेश खानने गेल्या वर्षी यूएसएमध्ये पहिला सामनावीर पुरस्कार जिंकल्याची आठवण करून दिली. “माझा पहिला सामनावीराचा पुरस्कार मी गेल्या वर्षी याच मैदानावर घेतला होता,” अशी भावना त्याने व्यक्त केली. गेल्या वर्षी याच मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध १७ धावा देऊन २ विकेट्स घेतल्याबद्दल पुरस्कार जिंकला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi lionel messi to shopping after arriving in florida usa team indias star shares first thing comes in their mind avw