Mohammed Siraj Record: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळला जात आहे. या सामन्याला चार दिवस पूर्ण झाले आहेत. सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी करत वेस्ट इंडीजच्या फलंदाजांची चांगलीच पळताभुई केली. त्याने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या ५ फलंदाजांना बाद करून कसोटी क्रिकेटमधील आपला दुसरा ५ विकेट्स घेण्याचा टप्पा पूर्ण केला. यासह त्याने ३४ वर्षे जुन्या कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिराजने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या जोशुआ दा सिल्वा, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, केमार रोच आणि शॅनन गॅब्रिएल यांना बाद करत फाईव्ह विकेट हॉल म्हणजेच दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेतल्या. पोर्ट ऑफ स्पेन येथे कसोटीच्या एका डावात ५ विकेट्स घेणारा सिराज भारताकडून सातवा गोलंदाज ठरला. सिराजच्या आधी १९८९ मध्ये भारताचा माजी कर्णधार कपिल देव पोर्ट ऑफ स्पेनमध्ये ५ विकेट्स घेणारा अव्वल गोलंदाज ठरला होता. आता मोहम्मद सिराजने ३४ वर्षे जुन्या विक्रमाची पुनरावृत्ती केली आहे. सिराजचा हा पहिला वेस्ट इंडिज दौरा आहे. सिराजने भारतासाठी आतापर्यंत २१ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्याच्या आधी ३९ डावांमध्ये गोलंदाजी करताना सिराजने ३०.२४च्या सरासरीने ५९ विकेट्स घेतल्या आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत वेस्ट इंडिजच्या भूमीवर एका डावात ५ विकेट्स घेणारा सिराज सातवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी वेस्ट इंडिजमध्ये इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, कपिल देव, भुवनेश्वर कुमार, अभय कुरुविला आणि व्यंकटेश प्रसाद यांनी ही कामगिरी केली होती. माहितीसाठी की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक वेळा ५ विकेट्स घेणारा इशांत शर्माच्या नावावर आहे. इशांतने आपल्या कारकिर्दीत वेस्ट इंडिजच्या भूमीवर कसोटीत एकूण ३ वेळा एका डावात ५ विकेट्स घेतले. दुसरीकडे, बुमराहने दोन वेळा आणि कपिल देवने देखील आपल्या कारकिर्दीत दोन वेळा वेस्ट इंडिजच्या भूमीवर ५ विकेट्स घेतल्या. त्याचवेळी भुवी आणि कुरुविला यांनी वेस्ट इंडिजमध्ये १-१ वेळा असा पराक्रम केला होता.

हेही वाचा: IND vs WI: ‘बझबॉल’वर टीम इंडियाच्या तुफानी शैलीने गाजवले वर्चस्व! रोहितचे वेगवान अर्धशतक तर भारताच्या नावावर ‘या’ विश्वविक्रमाची नोंद

वेस्ट इंडिजमध्ये सर्वाधिक पाच विकेट्स घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज

इशांत शर्मा – ३

जसप्रीत बुमराह – २

कपिल देव – २

भुवनेश्वर कुमार – १

अभय कुरुविला – १

व्यंकटेश प्रसाद – १

मोहम्मद सिराज – १

हेही वाचा: IND vs WI: मोहम्मद सिराजने केले मोठे भाकीत, ‘हा’ खेळाडू आज भारताला विजय मिळवून देणार; म्हणाला, “चेंडू वळण…”

दुसऱ्या सामन्याची ही स्थिती आहे

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीचे चार दिवस पूर्ण झाले आहेत. आतापर्यंतच्या सामन्यात टीम इंडिया खूप पुढे दिसत आहे. भारतीय संघाने २ बाद १८१ धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला आणि यजमान वेस्ट इंडिजला ३६५ धावांचे लक्ष्य दिले. धावांचा पाठलाग करताना यजमान संघाने चौथ्या दिवसअखेर २ बाद ७६ धावा केल्या आहेत. आता शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजला २८९ धावांची गरज आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi mohammad siraj created history in port of spain equals kapil dev after 34 years avw