Mohammad Siraj, IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला जात आहे. सामन्याचे पहिले चार दिवस गोलंदाजांना फारशी मदत मिळाली नाही, मात्र मोहम्मद सिराजने सामन्याच्या शेवटच्या दिवसाबाबत मोठा अंदाज वर्तवला आहे. भारताने वेस्ट इंडिजला विजयासाठी ३६५ धावांचे लक्ष्य दिले आहे, प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत २ बाद ७६ धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडिजने ४४ धावांत दोन विकेट्स गमावल्या होत्या आणि दोन्ही विकेट्स या आर. अश्विनच्या खात्यात गेल्या. मात्र, यानंतर तेजनारिन चंदरपॉल आणि जर्मेन ब्लॅकवुड यांनी संयमी फलंदाजी केली. सिराजने सामन्याच्या शेवटच्या दिवसाचे भाकित केले आहे की, “आर अश्विन कॅरेबियन बॅटिंग लाइनअपला लवकरच बाद करून त्यांना घरी पाठवेल.” सिराजने सांगितले की, “सामन्याच्या पाचव्या दिवशी अश्विनच्या नेतृत्वाखाली भारत २-० ने मालिका जिंकेल.”
भारताचा वेगवान गोलंदाज सिराज म्हणाला, “खेळपट्टी पाहता अश्विन कॅरेबियन डाव उद्ध्वस्त करेल असे वाटते. चेंडू वळण घेत आहे.” दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजी करून मोठे लक्ष्य देणे हा भारताच्या रणनीतीचा भाग असल्याचेही त्याने सांगितले. भारतीय फलंदाजांनी विशेषतः इशान किशनने ३४ चेंडूत ५२ धावा केल्या. तो म्हणाला, “इशान आक्रमक फलंदाज आहे. जर ऋषभ पंत संघात नसेल तर तो काही प्रमाणात त्याची पोकळी भरून काढू शकतो. तो चेंडूला सीमारेषेपार लांब मारू शकतो आणि मैदानाच्या सर्व बाजूला मोठे फटके खेळू शकतो. पहिल्या डावात आमच्याकडे आघाडी होती, त्यामुळे दुसऱ्या डावात कमी वेळात अधिक धावा करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते आणि ठरवल्याप्रमाणे ते झाले आहे.”
भारतीय संघाने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्माने ८० धावांची आणि दुसरीकडे विराट कोहलीने १२१ धावांची संस्मरणीय खेळी खेळली. प्रत्युत्तरात कॅरेबियन संघ पहिल्या डावात २५५ धावांत सर्वबाद झाला. भारताने दुसरा डाव २ बाद १८१ धावांवर घोषित केला. रोहितने ४४ चेंडूत ५७ धावा केल्या, तर इशानने ३४ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात ७.५४च्या धावगतीने धावा केल्या.