भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, नवोदीत युवा गोलंदाज नवदीप सैनीचं कौतुक केलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात नवदीपने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्यांदा गोलंदाजी करताना नवदीपने विंडीजच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं. महत्वाची गोष्ट म्हणजे कायरन पोलार्डसारखा आक्रमक फलंदाज समोर असतानाही नवदीपने सामन्याच्या अखेरच्या षटकात त्याला चकवत षटक निर्धाव टाकलं. याच षटकात नवदीपने पोलार्डचा बळीही घेतला. त्याच्या या कामगिरीवर कर्णधार विराट कोहली चांगलाच खुश झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य वाचा – मैदानात उतरण्याआधीच तुझी कारकीर्द संपवू पाहणाऱ्यांची तू विकेट घेतलीस !

“नवदीपला अजुन खूप मोठा प्रवास करायचा आहे. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली होती. तो सध्या अनुभवाच्या दृष्टीकोनातून नवीन आहे. पण त्याच्याकडे चांगला गोलंदाज होण्याची क्षमता आहे. आजही त्याच्याइतकी जलद गोलंदाजी फार कमी जणांना जमते. त्यामुळे भविष्यकाळात आपलं नाव भारतीय क्रिकेटमध्ये मोठं करण्याची त्याच्याकडे संधी आहे, एकंदरीत त्याचं भविष्य उज्वल आहे.” विराट सामना संपल्यानंतर बोलत होता.

अवश्य वाचा – Ind vs WI : पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांची ऐतिहासिक कामगिरी

दरम्यान, विजयासाठी विंडीजने दिलेल्या ९६ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था बिकट झाली होती. ६ गडी गमावल्यानंतर विंडीजचा संघ सामन्यात पुनरागमन करतो की काय असं वाटत असतानाच, फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने षटकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं

अवश्य वाचा – टी-२० क्रिकेटमध्ये वॉशिंग्टनची ‘सुंदर’ कामगिरी, मिळवला अनोखा बहुमान