India vs West Indies 1st: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका चेंडूवर चौकार मारल्यानंतर आनंद साजरा करताना दिसत आहे. सहसा कोहली क्रिकेटच्या मैदानावर असे करताना दिसत नाही. त्याच्या शतकानंतर किंवा बरोबरीत सामना जिंकल्यावर तो असे सेलिब्रेशन करताना दिसतो. पण यावेळी ना त्याने शतक झळकावलं ना कुठली मोठी कामगिरी केली, पण मग का साजरा केला?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या १५० धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने २ बाद ३१२ धावा केल्या आहेत. यावेळी भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली खेळत आहेत. यशस्वी जैस्वाल १४३ धावा करून खेळत आहे. तर विराट कोहली ३६ धावा करून क्रीजवर आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये ७२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या नजरा मोठ्या धावसंख्येवर असतील. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विराट कोहलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली दिसत आहे. खरंतर, विराट कोहलीने चौकार मारल्यानंतर आनंद साजरा केला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. वास्तविक, हा चौकार विराट कोहलीच्या डावातील पहिला चौकार होता जो ८१व्या चेंडूवर आला होता. संघाने रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या दोन मोठ्या विकेट्स अवघ्या ११ धावांत गमावल्या असताना विराट कोहली फलंदाजीला आला.
अशा परिस्थितीत कोहलीला क्रीझवर उभे राहून यशस्वी जैस्वालला साथ देण्याची गरज होती. यादरम्यान वेस्ट इंडिजचे गोलंदाज किंग कोहलीला हात उघडण्याची संधी देत नव्हते, पण कोहलीने संयम गमावला नाही आणि तो क्रीजवर राहिला.
हेही वाचा: IND vs WI: रोहित-यशस्वी जोडीने मोडला २२ वर्षे जुना विक्रम, गावसकर आणि सेहवागला मागे टाकले
डॉमिनिका कसोटीत भारतीय संघाचा दबदबा कायम आहे
डॉमिनिका कसोटीचा दुसरा दिवस भारताच्या नावावर होता. भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी शतके झळकावली. रोहित शर्मा २२१ चेंडूत १०३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत १० चौकार आणि २ षटकार मारले. मात्र, शुबमन गिलने ६ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून जोमेल वॅरिकन आणि अॅलिक अथनझे यांना १-१ असे यश मिळाले. सध्या यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी २०५ चेंडूत ७२ धावांची भागीदारी आहे.