IND vs WI, Team India: कसोटीनंतर, भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पहिला सामना २७ जुलै रोजी होणार आहे. एकदिवसीय संघात समाविष्ट केलेले बहुतेक खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाले आहेत, त्यापैकी बरेच जण कसोटी खेळत आहेत आणि अनेक जण नुकतेच विंडीजमध्ये पोहोचले आहेत ज्यांचा कसोटी संघात समावेश नव्हता. यामध्ये संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, उमरान मलिक आदींचा समावेश आहे. या खेळाडूंनी वेस्ट इंडीजमध्ये पोहचताच थेट समुद्रकिनारा गाठला. त्यांच्या मौजमस्तीचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत.

सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन असे अनेक खेळाडू नुकतेच वेस्ट इंडीजला पोहोचले आहेत. सूर्यकुमारची पत्नी देविशा शेट्टीने त्यांचे समुद्रकिनारी मजामस्तीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये खेळाडू बीचवर व्हॉलीबॉल खेळत आहेत. या दौऱ्यावर संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांच्या पत्नीही आल्या आहेत. त्यांनी देखील वेस्ट इंडीजच्या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेतला आहे.

टीम इंडियाच्या या खेळाडूंमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक देखील आहे. त्याचा आयपीएलमध्ये फॉर्म फारसा चांगला नव्हता. मात्र, आता त्याला या दौऱ्यावर दमदार कामगिरी करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. आगामी विश्वचषक हा भारतात होणार असल्याने ही मालिका टीम इंडियासाठी खूप महत्वाची मानली जात आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वन डे मालिकेला २७ जुलैपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही मालिका भारतासाठी महत्त्वाची असेल, आगामी एकदिवसीय विश्वचषक पाहता योग्य प्लेइंग ११ यातून निश्चित केली जाईल. आता त्या खेळाडूंना अधिक प्राधान्य दिले जाईल जे विश्वचषक संघाचा विचार करत आहेत किंवा त्याचा भाग होणार आहेत. वन डे मालिकेतील दुसरा सामना २९ जुलैला आणि शेवटचा सामना १ ऑगस्टला होणार आहे. वेस्ट इंडीजचा संघ विश्वचषकाच्या पात्रता फेरीतच गारद झाल्याने मुख्य स्पर्धेला पात्र होऊ शकला नाही. इतिहासात पहिल्यांदाच दोनवेळचा वर्ल्डकप विजेता संघशिवाय एकदिवसीय विश्वचषक होणार आहे.

हेही वाचा: IND vs WI: किंग कोहलीचे कौतुक करताना वेस्ट इंडिजच्या प्रेक्षकांना शब्द पडले अपुरे! खुद्द BCCIलाही Video शेअर करण्याचा मोह आवरेना

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, मुहम्मद कुमार यादव, युशराज कुमार, मुहम्मद यादव, युवराज मुहम्मद, युवराज यादव

Story img Loader