India vs West Indies 2023 Schedule: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संपल्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टीम इंडिया विंडीज दौऱ्यावर दोन कसोटी, तीन वन डे आणि पाच टी२० सामने खेळणार आहे. विंडीज दौरा भारताच्या पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलची सुरुवात देखील करेल. याबरोबरच टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारी करण्याची संधी मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय खेळाडूंना एक महिन्याचा ब्रेक

WTC फायनलनंतर भारतीय संघाला जवळपास महिनाभराचा ब्रेक मिळाला आहे. १२ जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला डॉमिनिका येथे सुरुवात होणार आहे. दुसरा कसोटी सामना २० जुलैपासून त्रिनिदादमध्ये खेळवला जाणार आहे. त्याच वेळी, २७ जुलैपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. पहिला आणि दुसरा वन डे (२९ जुलै) बार्बाडोसमध्ये खेळवला जाईल, तर तिसरा एकदिवसीय सामना १ ऑगस्टला त्रिनिदादमध्ये खेळवला जाईल.

३ ऑगस्टपासून टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला ३ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला टी२० त्रिनिदादमध्ये, दुसरा टी२० ६ ऑगस्टला गयानामध्ये, तिसरा टी२० ८ ऑगस्टला गयानामध्ये, चौथा आणि पाचवा टी२० सामना अनुक्रमे १२ व १३ ऑगस्टला फ्लोरिडामध्ये खेळवला जाईल. म्हणजेच अमेरिकेतही दोन टी२० सामने खेळवले जातील. पुढील टी२० विश्वचषक म्हणजे २०२४ टी२० विश्वचषक फक्त वेस्ट इंडिज आणि (USA) अमेरिकेत खेळवला जाणार आहे.

हेही वाचा: WTC 2023 Final: “भारतात अडीच दिवसात मॅच जिंकून ट्रॉफी…”, माजी BCCI अध्यक्षांच्यासमोर हरभजनची टीम इंडियावर सडकून टीका

संघात मोठे बदल अपेक्षित आहेत

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि टी२० मालिकेसाठी संघात अनेक बदल केले जाऊ शकतात, असे मानले जात आहे. पुढील WTC फायनल २०२५ मध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन खेळाडू तयार करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खराब कामगिरीमुळे चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांना संघातून वगळले जाऊ शकते. त्याचबरोबर त्यांच्या जागी यशस्वी जैस्वाल आणि मुकेश कुमार यांचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात समावेश केला जाऊ शकतो.

रिंकू सिंग-जितेश शर्मा यांना संधी मिळू शकते

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिव सुंदर दास यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने पुढच्या पिढीतील खेळाडूंचा शोध सुरू केला आहे. टी२० मालिकेसाठी पूर्णपणे नवीन संघ पाठवला जाऊ शकतो. यामध्ये आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंचाही समावेश होऊ शकतो. रिंकू सिंग आणि जितेश शर्मासारख्या खेळाडूंना टी२० संघात संधी मिळू शकते.

हेही वाचा: ODI WC 2023: वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ दिवशी होणार भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, जाणून घ्या

रोहित-कोहलीला टी२० संघातून विश्रांती दिली जाऊ शकते

याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल यांनाही टी२० संघात स्थान मिळू शकते. आयपीएलमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या मोहित शर्मालाही टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकते. मोहितने आयपीएलमध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याचवेळी रोहित शर्मा, विराट कोहली यांना पुन्हा एकदा टी२० संघाबाहेर ठेवले जाऊ शकते, तर सिराज आणि शमी यांना कामाचा ताण आणि आगामी एकदिवसीय विश्वचषक पाहता टी२० मालिकेदरम्यान विश्रांती दिली जाऊ शकते.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक

दोन कसोटी सामने

पहिला सामना – १२ जुलै, बुधवार ते १६ जुलै, रविवार – विंडसर पार्क, रोसेओ, डॉमिनिका

दुसरा सामना – २० जुलै, गुरुवार ते २४ जुलै, सोमवार – क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद

तीन वन डे

पहिला सामना – गुरुवार, २७ जुलै – केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस

दुसरा सामना – २९ जुलै, शुक्रवार – केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस

तिसरा सामना – १ ऑगस्ट, मंगळवार – क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद

पाच टी२० आंतरराष्ट्रीय सामने

पहिला सामना – ४ ऑगस्ट, शुक्रवार – क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद

दुसरा सामना – ६ ऑगस्ट, रविवार – प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना

तिसरा सामना – ८ ऑगस्ट, मंगळवार – प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना

चौथा सामना – १२ ऑगस्ट, शनिवार – सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा

पाचवा सामना – १३ ऑगस्ट, रविवार – सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi odi t20 and test series will be played between india and west indies know full schedule here avw