India vs West Indies 3rd T20 Playing 11 Prediction: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे, जिथे वेस्ट इंडिजने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिकेत टी२० अशी आघाडी घेतली आहे. त्याच वेळी, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात उद्या म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी मालिकेतील तिसरा टी२० खेळायचा आहे. मात्र, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासाठी तिसरी कसोटी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण टीम इंडिया तिसरी टी२० हरली तर १७ वर्षात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजविरुद्धची टी२० मालिका गमावेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माहितीसाठी की, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी२० खूप महत्त्वाचा आहे. कारण जर भारताने हा सामना गमावला तर तो मालिकाही गमावेल, जी १७ वर्षांनंतर पहिल्यांदाच होणार आहे. वास्तविक, तिसरी टी२० आवश्यक आहे कारण यजमान संघ जिंकला तर संघ मालिकाही जिंकेल. दुसरीकडे, भारताने विजय मिळवला तर पराभवाची हॅट्ट्रिक टाळता येईलच शिवाय मालिकाही वाचवेल.

भारत शेवटचा टी२० सामना २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पराभूत झाला होता

वेस्ट इंडिजने भारताचा शेवटचा पराभव हा २०१६ मध्ये द्विपक्षीय T20I मालिकेत केला होता. त्याचवेळी, पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर आता टीम इंडिया ०-२ने मागे आहे. या फॉरमॅटमध्ये फलंदाजांना पहिल्याच चेंडूपासून आक्रमकपणे खेळावे लागते, मात्र आतापर्यंत भारताचे आघाडीचे फलंदाज इशान किशन, शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना तसे करता आलेले नाही. यामुळे संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांसारख्या मधल्या फळीतील फलंदाजांवर दबाव निर्माण झाला आहे.

टीम इंडिया १७ वर्षात वेस्ट इंडिजकडून हरली नाही

विशेष म्हणजे, भारताने गेल्या १७ वर्षांपासून वेस्ट इंडिजविरुद्ध एकही टी२० मालिका गमावलेली नाही. मात्र, किमान तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भारत १७ वर्षांपासून विजय मिळवत आहे. दुसरीकडे, जर वेस्ट इंडिजने तिसरी टी२० जिंकली तर ते मालिकाही जिंकतील. अशा परिस्थितीत भारत तब्बल १७ वर्षांनंतर वेस्ट इंडिजविरुद्ध वेस्ट इंडीजमध्ये टी२० मालिका गमावणार आहे. त्यामुळे भारताची लाज हार्दिक पांड्याच्या हाती आहे, जी तो आपल्या कर्णधारपदाच्या नेतृत्वात वाचवतो का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा: PCB: आशिया कपपूर्वी पाकिस्तानची जोरदार तयारी! माजी कर्णधार इंझमाम-उल-हकवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

दोन्ही सामने असे होते

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना कॅरेबियन संघाने ४ धावांनी जिंकला. वास्तविक, वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना १४९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताला केवळ १४५ धावा करता आल्या. त्याचवेळी, दुसऱ्या टी२० मध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना १५२ धावा केल्या होत्या, ज्या वेस्ट इंडिजने १८.५ षटकात १५२ धावा केल्या. आता तिसरा टी२० सामना ८ ऑगस्ट रोजी गयाना येथे खेळवला जाईल.

हेही वाचा: Babar Azam: वर्ल्डकपआधी पाकिस्तानी कर्णधार आला फॉर्मात; बाबरने शतक ठोकत रचला इतिहास, गेलचा मोडला विक्रम

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेईंग ११

भारत: शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन/यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज: ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi playing11 india in danger of losing t20 series against west indies after 7 years yashasvi will get a chance avw