IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉने शतक झळकावले. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात राजकोटच्या मैदानावर हा पराक्रम केला. पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करणारा पृथ्वी शॉ भारताचा १५वा खेळाडू ठरला. या व्यतिरिक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर एक पराक्रम करणारा पृथ्वी शॉ हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. सचिननंतर कसोटीत शतक झळकावणारा पृथ्वी हा दुसरा तरूण खेळाडू ठरला आहे.
सचिनने १७ वर्षे आणि १०७ दिवसाचा असताना आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. त्याने हे शतक १९९० साली मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध केले होते. या सामन्यात सचिनने नाबाद ११९ धावा केल्या होत्या. पृथ्वीने मात्र १८ वर्षे आणि ३२९ दिवस इतके वय असताना आज आपले पहिले कसोटी शतक ठोकले. त्यामुळे सचिननंतर तो कसोटी शतक झळकावणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे.
The youngest Indian batsman to score a century on Test debut – what an entrance from @PrithviShaw!
https://t.co/SreOH4nxlS#INDvWI #howzstat pic.twitter.com/42otMv4orD
; ICC (@ICC) October 4, 2018
दरम्यान, सचिननेही त्याला शुभेच्छा दिल्या. ‘अाक्रमक शतक पाहून आनंद झाला’, असे त्याने ट्विट केले आहे.
Lovely to see such an attacking knock in your first innings, @prithvishaw! Continue batting fearlessly. #INDvWI pic.twitter.com/IIM2IifRAd
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 4, 2018
पृथ्वी शॉने १५४ चेंडूत १३४ धावा केल्या. या शानदार खेळीत त्याने १९ चौकार ठोकले. देवेंद्र बिशू याने स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेत पृथ्वीला तंबूत धाडले.