वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात भारताने ७ गडी राखून सामन्यात बाजी मारली. भारताकडून युवा फिरकीरपटू राहुल चहरने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये खेळणारा तो ८१ वा खेळाडू ठरला आहे. याचसोबत भारताकडून आंतरराष्ट्री टी-२० क्रिकेटमध्ये कमी वयात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चहरने चौथं स्थान पटकावलं आहे.

भारताकडून सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण करणारे क्रिकेटपटू –

  • वॉशिंग्टन सुंदर – १८ वर्षे ८० दिवस
  • ऋषभ पंत – १९ वर्षे १२० दिवस
  • इशांत शर्मा – १९ वर्षे १५२ दिवस
  • राहुल चहर – २० वर्षे २ दिवस
  • सुरेश रैना – २० वर्षे ४ दिवस

सोमवारी झालेल्या सामन्यात पदार्पण करताना राहुलचे वय २० वर्षे २ दिवस एवढे होतं. भारताकडून सर्वात कमी वयात पदार्पण करण्याच्या यादीत राहुलने सुरेश रैनाला मागे टाकले आहे. रैनाने २० वर्षे ४ दिवस एवढे वय असताना भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केले होते.  अखेरच्या टी-२० सामन्यात राहुल चहरला केवळ १ बळी मिळवता आला.

अवश्य वाचा – विंडीजविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात दिपक चहरचा विक्रम

Story img Loader