India vs West Indies Dominica Ashwin 700 Wickets: डॉमिनिका येथे सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने जोरदार कमबॅक केली. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे टीम इंडियाला पहिल्याच दिवशी यजमानांना १५० धावांत गुंडाळण्यात यश आले. अश्विनने या काळात सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे ३३ वे ५ विकेट्स हॉल होते. सध्याच्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत तो आता एका डावात सर्वाधिक ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. होय, यादरम्यान त्याने इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा विक्रम मोडला आहे जो सध्या अ‍ॅशेस २०२३चा भाग आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे खेळला जात आहे. या सामन्यात रविचंद्रन अश्विनने विशेष कामगिरी केली. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० विकेट्स पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. या बाबतीत अनिल कुंबळे आघाडीवर आहे. कुंबळेने ९५६ विकेट्स घेतल्या आहेत.

INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?

अश्विनने हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वाधिक ३३ वेळा ५ विकेट्स हॉल घेण्याचा विक्रम केला आहे. त्याने जेम्स अँडरसनला मागे टाकले, ज्याने सक्रिय गोलंदाजांमध्ये ३२ वेळा हा पराक्रम केला आहे. हा पराक्रम करण्यासाठी अश्विनला केवळ १३१ डाव लागले आणि अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत २५३ डाव खेळले आहेत.

हेही वाचा: Team India: “बोलर्सची लाईन नाही लागली…”, आगामी वर्ल्डकप सामन्याआधी कर्णधार रोहित शर्माचे गोलंदाजांबाबत मोठे विधान

दुसरीकडे, सर्वाधिक ५ विकेट्स घेणाऱ्या सर्वकालीन गोलंदाजांच्या यादीत अश्विन आता ७व्या स्थानावर पोहोचला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळा एका डावात ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत हा पराक्रम ६७ वेळा केला आहे. त्याचबरोबर या यादीतील टॉप-७ मध्ये स्थान मिळवणारा अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी भारतीय दिग्गज अनिल कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये ३५ वेळा अशी कामगिरी केली आहे.

वास्तविक डॉमिनिका कसोटीत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाज अश्विनने ५ विकेट्स घेतल्या. त्याने कर्णधार क्रेग ब्रेथवेट, तागीनारायण चंद्रपॉल, अ‍ॅलिक आणि अल्झारी जोसेफ यांना बाद केले. पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला. त्यांनी पहिल्या डावात वेस्ट इंडिजला १५० धावांत गुंडाळले. यानंतर, खेळ संपला तेव्हा त्याने टीम इंडियाच्या बिनबाद ८० धावा झाल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मासोबत पदार्पण करणारी यशस्वी जैस्वाल नाबाद आहे. अश्विनने या खेळीत ७०० आंतरराष्ट्रीय विकेट्सही पूर्ण केल्या. तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया कप २०२३चे सर्व सामने टीम इंडिया खेळणार श्रीलंकेत! ‘या’ मैदानावर होणार भारत-पाक सामना

अनिल कुंबळेने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत ९५६ विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत हरभजन सिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. भज्जीने ७११ विकेट घेतल्या आहेत. आता अश्विन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कपिल देव या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहेत. कपिलने ६८७ विकेट्स घेतल्या आहेत. तर झहीर खान ६१० विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५ विकेट्स घेणारे गोलंदाज

मुथय्या मुरलीधरन – ६७

शेन वॉर्न – ३७

रिचर्ड हेडली – ३६

अनिल कुंबळे – ३५

रंगना हेरथ – ३४

आर. अश्विन – ३३*

जेम्स अँडरसन – ३२

अश्विनची कसोटी क्रिकेटमधील वेस्ट इंडिजविरुद्धची ही पाचवी ५ विकेट्स आहे. त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ किंवा त्याहून अधिक वेळा एका डावात ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

अश्विनने कसोटी या देशांविरुद्ध ५ विकेट्स घेतले

ऑस्ट्रेलिया – ७

इंग्लंड – ६

न्यूझीलंड – ६

वेस्ट इंडिज – ५

दक्षिण आफ्रिका – ५

श्रीलंका – ३

बांगलादेश – १

Story img Loader