Rohit Sharma, IND vs WI 1st ODI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत भारताची सुरुवात चांगली झाली आहे. त्याने बार्बाडोसमधील मालिकेतील पहिला सामना पाच गडी राखून जिंकला. या सामन्यात टीम इंडियाने अनेक प्रयोग केले. वेस्ट इंडिजचा संघ ११४ धावांवर आटोपल्यानंतर त्याने फलंदाजी क्रम बदलला. कर्णधार रोहित शर्मा सलामीला उतरला नाही त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास पसंती दर्शवली. टीम इंडियाच्या पाच विकेट्स पडल्या, पण तरीही विराट कोहली फलंदाजी करायला आला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने १९ चेंडूत नाबाद १२ धावा करत सामना संपवला. रोहितने १२ वर्षांनंतर वन डेत सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली. सातव्या स्थानावर फलंदाजी करायला शेवटच्या वेळी तो १५ जानेवारी २०११ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उतरला होता. त्या सामन्यात हिटमनने ९ धावा केल्या होत्या आणि भारताने हा सामना एका धावेने जिंकला होता. योगायोगाची गोष्ट अशी आहे की, त्याच वर्षी टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता. रोहितने जानेवारीत त्या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती आणि एप्रिलमध्ये भारत वर्ल्ड चॅम्पियन झाला होता. आता यावर्षी पण वर्ल्डकप असून तो भारतात होणार आहे, त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन होणार का? ते पाहावे लागेल.

हेही वाचा: Jay Shah: बुमराहबाबत BCCIची मोठी घोषणा! वर्ल्ड कपआधी टीम इंडियात होणार पुनरागमन, सचिव जय शाह म्हणाले, “तो पूर्णपणे फिट…”

रोहित शर्मा सामन्यानंतर काय म्हणाला?

रोहितला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला? याबाबत विचारले असता त्याने सांगितले की, “या क्रमांकावर फलंदाजी करताना मला १२ वर्षापूर्वीच्या पदार्पणाच्या दिवसांची आठवण झाली.” रोहित म्हणाला, “मला कधीच वाटलं नव्हतं की खेळपट्टी अशी खेळेल. खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंसाठी सर्वकाही होते. आमच्या गोलंदाजांनी त्यांना कमी धावसंख्येत रोखण्यात चांगले यश मिळाले. कुलदीप यादवने अप्रतिम कामगिरी केली. येथे आलेल्या खेळाडूंना एकदिवसीय सामन्यांमध्ये पुरेसा वेळ द्यायचा होता म्हणून मी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आलो.”

रोहित पुढे म्हणाला, “जेव्हाही संधी मिळेल तेव्हा आम्ही असे प्रयोग करत राहू. वेस्ट इंडीजला ११५ पर्यंत मर्यादित ठेवल्यानंतर, आम्हाला माहित होते की आम्ही काही खेळाडूंना आजमावू शकतो. मला वाटत नाही की, आम्हाला अशा अधिक संधी मिळतील. जेव्हा मी भारताकडून पदार्पण केले तेव्हा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करायचो. मला ते दिवस आठवल्याने मी खूप नॉस्टॅल्जिक झालो आहे.”

हेही वाचा: IND vs WI 1st ODI: पापणी लवते ना लवते तोच…, विराट कोहलीने एका हाताने घेतला अफलातून कॅच; पाहा Video

रोहित शर्माला सलामीला फलंदाजीसाठी कधी संधी मिळाली?

पदार्पणानंतर हिटमॅन सतत लोअर ऑर्डरला फलंदाजीत संघर्ष करताना दिसला. त्यामुळे २०११च्या विश्वचषकात त्याला संधी मिळाली नव्हती. त्यानंतर २०१२ मध्ये संघाचा कर्णधार एम.एस. धोनीने रोहितवर डाव आजमावून पहिला आणि त्याला ओपन करण्यास सांगितले. हाच काळ होता जेव्हा रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान शतक झळकावले होते. ओपनिंग करताना त्याने वन डेमध्ये तीन द्विशतकेही झळकावली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi rohit remembered the old days after the match against west indies this happened for the first time in 2011 with hitman avw