IND vs WI ODI. New Jersey Launch: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका गुरुवारपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी फोटोशूट करून घेतले, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली दिसत नाहीयेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी विश्वचषक आणि आशिया कपच्या दृष्टीने ही मालिका टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. या मालिकेत असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना आशिया चषकापूर्वी स्वत:ला सिद्ध करायचे आहे. प्लेइंग ११ मध्ये कोणाला संधी मिळेल? त्याची कामगिरी ही टीम इंडियासाठी महत्त्वाची असेल. आशिया चषकापूर्वी भारतीय संघाची ही शेवटची एकदिवसीय मालिका आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी टीम इंडियाच्या फोटोशूटचा व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात विराट आणि रोहित दिसत नव्हते.

पहिला एकदिवसीय सामना गुरुवारी होणार आहे

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वन डे सामना २७ जुलै रोजी बार्बाडोस येथे खेळवला जाणार आहे. दुसरा सामना २९ रोजी आणि शेवटची वन डे १ ऑगस्ट रोजी होईल. रोहित शर्मा आणि शाई होप कर्णधार म्हणून आमनेसामने असतील. या मालिकेत कोणाला संधी द्यायची हे रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन ठरवणार आहेत. पहिले आशिया चषकासाठी विचार केला जात असून त्यानुसार प्लेइंग ११ मध्ये संधी देण्यात येणार आहे. या मालिकेकडे विश्वचषकाची तयारी म्हणूनही पाहिले जात आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला यावेळी वर्ल्डकपमध्ये स्थान मिळवता आले नाही. विंडीज विश्वचषक न खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा: IND vs PAK: भारत-पाकिस्तान वर्ल्डकप सामन्याची तारीख बदलणार? १५ ऑक्टोबरऐवजी ‘या’ तारखेचा पर्याय!

किंग्स्टन ओव्हल स्टेडियमवर आतापर्यंत एकूण ४४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. भारताने येथे ३ वन डे सामने खेळले आहेत. या मैदानावर २००२ मध्ये भारताने शेवटचा वन डे सामना खेळला होता, ज्यामध्ये भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला होता. या मैदानावरील शेवटचा सामना ऑगस्ट २०२२ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड होता, जो न्यूझीलंडने ५ गडी राखून जिंकला होता. या मैदानावर वेस्ट इंडिजने गेल्या ५ पैकी ३ सामने गमावले आहेत.

हेही वाचा: Yuvraj Singh: “गपगुमान ४० लाख दे नाहीतर…”, माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या आईला व्हॉट्सअ‍ॅपवर धमकी

दोन्ही संघाचे खेळाडू

वेस्ट इंडिज संघ: शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उपकर्णधार), अ‍ॅलिक अथनाझ, यानिक कारिया, केसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रॅंडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर, ओशान थॉमस, डेनिस बुली, रोस्टन चेस, मॅकेनी क्लार्क, क्वाम हॉज, जैर मॅककॅलिस्टर, ओबेद मॅककॉय, केविन विकहॅम

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र यादव, कुलदीप यादव, जयदेव उनादकड, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi rohit sharma and virat kohli did not appear team indias photoshoot for odi series video went viral avw