Rohit Sharma on Ajinkya Rahane, IND vs WI: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपला मजेशीर स्वभाव कधीच सोडत नाही. कर्णधार झाल्यानंतरही रोहित सहकारी खेळाडूंची हास्यविनोद, मजामस्ती करत असतो. वेस्ट इंडिज दौऱ्यावर असेच काहीसे घडले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून खेळवला जाणार आहे. त्याआधी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे पत्रकार परिषदेला पोहोचला. मैदानावरच आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हिटमॅन पोहचला. कारण तो उपकर्णधार रहाणेच्या शेजारीच उभा होता.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी विंडसर पार्क डॉमिनिका येथे खेळवली जाईल. अजिंक्य रहाणे कसोटी सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलत होता, त्याच दरम्यान कर्णधार रोहित शर्मा तेथे आला. रोहित पत्रकार परिषदेत थेट घुसला आणि त्याने रहाणेलाच प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यादरम्यान तेथे पाऊसही पडला, त्यानंतर सर्वांनी तेथून पळ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Rohit Sharma, Ritika Sajdeh become parents again to a baby boy
Rohit Sharma : रोहित शर्मा झाला पुन्हा बाबा; टीम इंडियानेच केलं शिक्कामोर्तब! तिलक-संजूसह सूर्याने दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Raosaheb Danave Beating Karyakarta
Raosaheb Danave Viral Video : फोटो फ्रेममध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी लाथाडलं; VIDEO व्हायरल!
Kushal Badrike
“कवीने संसारात अडकू नये…”, कुशल बद्रिकेने शेअर केला पत्नीबरोबरचा व्हिडीओ; श्रेया बुगडे कमेंट करीत म्हणाली…

व्हिडीओमध्ये पत्रकार पहिला प्रश्न अजिंक्य रहाणेला विचारतो की, “तू भारताचे उपकर्णधारपद भूषवत आहेस, या मालिकेकडे तू कसा पाहतोस? कारण ही WTCची पुढची सायकल आहे. यानंतर अजिंक्य रहाणेला वयाबद्दल प्रश्न विचारला जातो. या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना तो म्हणतो की, “म्हणजे याचे उत्तर देता नाही येणार कारण वयाच्या बाबतीत मी रोहित पेक्षा अजून लहान आहे. कर्णधार रोहित शर्मा मला जी काही भूमिका देईल, ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.” असे मजेशीर उत्तर त्याने दिले आणि एकच हशा पिकला.

हेही वाचा: Johny Bairstow: बेअरस्टोची वादग्रस्त विकेट, लेमन ज्यूस अन् बार टेंडर; अश्विनने केला राहुल द्रविडचा खुमासदार किस्सा शेअर

रोहित शर्मा झाला रिपोर्टर, अजिंक्य रहाणेला विचारले प्रश्न

बीसीसीआयने हा व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “जेव्हा रोहित शर्मा झाला रिपोर्टर आणि पत्रकार परिषदेत उपकर्णधार अजिंक्य रहाणेला प्रश्न विचारले. यानंतर हिटमॅनने अजिंक्य रहाणेला विचारले की “मला तुमचा अनुभव सांगा, तुम्ही अनेकदा वेस्ट इंडिजला गेला आहात. या विकेटवर तुम्ही खूप क्रिकेट खेळला आहेस, भरपूर धावा केल्या. त्यामुळे तुम्हाला युवा खेळाडूंशी कसा संवाद साधायला आवडेल, त्यांना काय सांगाल तुम्ही?”

यावर उत्तर देताना अजिंक्य रहाणे म्हणाला, “माझा संदेश सर्व युवा खेळाडूंसाठी आहे की त्यांनी वेस्ट इंडिजमध्ये संयम बाळगणे खूप गरजेचे आहे.” मग रोहितने विचारलं की, “इथलं वातावरण खूप थंड आहे. क्रिकेटपटूंसाठी कामावर लक्ष केंद्रित करणे किती महत्त्वाचे आहे. ५ वाजल्यानंतर काय करायचे याचा नंतर विचार व्हायला हवा.”

हेही वाचा: IND vs PAK: “पराभवाच्या भीतीने भारत आमच्याविरुद्ध…”, वर्ल्डकपआधी पाकिस्तानच्या माजी खेळाडूने टीम इंडियाला डिवचले

अजिंक्य रहाणेने यावर उत्तर दिले तो म्हणाला, “तुम्ही ज्या देशात आहात त्या देशाला अनुसरून तेथील वातावरणाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. मैदानावर तुमचे सामन्याकडे असणे आवश्यक आहे. युवा खेळाडूंनी लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, मैदानाबाहेर काय करायचे याचा विचार करू नका, ते नंतर ठरवले जाईल.” हे सर्व सुरु असताना अचानक त्या दरम्यान तिथे पाऊस सुरू झाला. रोहित शर्मा धावत जातो आणि म्हणतो, “चला आता इथून निघूया, आम्ही मैदानाबाहेर आराम करू.” यानंतरही रहाणे बोलत होता मग रोहित शर्माने स्वतः हसत हसत त्याच्यासोबत त्याला नेले.

२०२३-२५ कसोटी चॅम्पियनशिपची सुरुवात

भारतीय संघ या मालिकेसह आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप २०२३-२५ ​​सायकलचीही सुरुवात करेल. टीम इंडियाने मागील दोन्ही मालिकांमध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिथे पराभवाला सामोरे जावे लागले. वेस्ट इंडिज हे भारतासाठी सोपे आव्हान मानले जात आहे पण रोहित शर्मा त्याला हलक्यात घेण्याची चूक करू शकत नाही.