भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन वनडे मालिकेतील पहिला सामना उद्या रविवारपासून (६ फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पूर्णवेळ वनडे कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच मालिका आहे. दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलने वनडे मालिकेत नेतृत्व केले, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकाने भारताचा ३-०ने पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रोहित शर्माने पहिल्या एकदिवसीय सामन्याबाबत पत्रकार परिषदेत अनेक गोष्टी सांगितल्या. बहिणीच्या लग्नामुळे केएल राहुल पहिला वनडे खेळत नाहीये. त्याचवेळी संघाचे दोन सलामीवीर शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड यांना करोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत मयंक अग्रवालचा बॅकअप म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.

रोहित शर्मा म्हणाला, “इशान किशन वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वनडेत सलामी देईल. मयंक अग्रवालचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र तो सध्या आयसोलेशनमध्ये असून त्याचा क्वारंटाइन कालावधी अद्याप पूर्ण झालेला नाही. अशा स्थितीत किशन डावाची सुरुवात करेल.” रोहितच्या नेतृत्वाखाली भारत आपला १०००वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. हा टप्पा गाठणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे.

हेही वाचा – भारताचा संघ निवडताना गांगुली करतो ढवळाढवळ? वाचा BCCIच्या ‘दादा’नं स्वत: दिलेलं उत्तर!

या वनडे मालिकेत कुलदीप यादव आणि यजुर्वेंद्र चहलची जोडी एकत्र गोलंदाजी करताना दिसणार का? या प्रश्नाच्या उत्तरात रोहित म्हणाला, “कुलदीप यादव आणि चहल यांनी यापूर्वी आमच्यासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याला वगळावे लागले कारण आम्हाला काही वेगळे सांघिक संयोजन वापरायचे होते. पण त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचे निश्चितच माझ्या मनात आहे.”