वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ५९ धावांनी विजय मिळवला. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना विराट कोहलीने १२० धावांची शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने आपल्या शतकी खेळीवर प्रतिक्रीया दिली.
“या खेळपट्टीवर २७० किंवा त्यापेक्षा जास्त धावसंख्या आव्हानात्मक ठरेल याचा आम्हाला अंदाज होता. जेव्हा संघाला गरज असते, त्यावेळी तुम्ही शतकी खेळी करता ही भावना कोणत्याही खेळाडूसाठी चांगलीच असते. शिखर-रोहित हवीतशी सुरुवात करुन देऊ शकले नाहीत. पहिल्या ३ फलंदाजांपैकी कोणीतरी एकाने चांगली सुरुवात करणं गरजेचं असतं. दुसऱ्या सामन्यात मला ती संधी मिळाली आणि मी त्याचं सोनं केलं.”
अवश्य वाचा – ब्रायन लाराला मागे टाकत विराटचा विंडीजमध्ये विक्रम
नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शिखर धवन स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराट कोहलीने रोहित शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाचा डाव सावरला. मात्र रोहितही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही, केवळ १८ धावा काढून रोहित माघारी परतला. यानंतर रोहितने श्रेयस अय्यरसोबत शतकी भागीदारी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.
अवश्य वाचा – Ind vs WI : ही आकडेवारी पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, होय विराट सचिनचा विक्रम मोडणार