India vs West Indies: वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात १५० धावांवर सर्वबाद झाला, त्याला प्रत्युत्तरात भारताने दोन गडी गमावून ३१२ धावा केल्या. टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करताना कर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल यांनी शतके झळकावली. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी २२९ धावांची भागीदारी केली. शतकी खेळीसह दोन्ही सलामीवीरांनी २२ वर्षे जुना विक्रम मोडला.

रोहित-यशस्वी जोडीने २२ वर्षे जुना विक्रम मोडला

रोहित-यशस्वी यांनी नंतर संजय बांगर आणि वीरेंद्र सेहवागची सर्वात मोठी सलामीची भागीदारीचा विक्रम मोडला. २००२ मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सेहवाग आणि बांगर यांनी डावाची सुरुवात केली आणि २०१ धावांची भागीदारी केली. आणि १३ जुलै रोजी रोहित आणि यशस्वीने मिळून हा विक्रम मोडला.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?

१७ वर्षे जुना रेकॉर्डही मोडला

रोहितने १० चौकार आणि २ षटकारांसह १०३ धावा केल्या तर यशस्वीने १४ चौकारांच्या मदतीने नाबाद १४३ धावा केल्या. या शतकी खेळीने दोन्ही सलामीवीरांनी अनेक विक्रम मोडीत काढले. वेस्ट इंडिजच्या भूमीवर शतकी भागीदारी करणारी रोहित-यशस्वी ही २००६ नंतर पहिली सलामीची जोडी ठरली. कॅरेबियनमध्ये केवळ चार भारतीय सलामी जोडींनी शतकी भागीदारी केली आहे.

या सलामीच्या जोडींमध्ये शतकी भागीदारी झाली आहे

१९७१ मध्ये सुनील गावसकर आणि अशोक मांकड यांनी १२३ धावांची नाबाद भागीदारी केली होती. गावसकर यांनी कॅरेबियन मैदानावर अंशुमन गायकवाड यांच्यासोबत शतकी भागीदारीही रचली होती. यानंतर वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर या सलामीच्या जोडीने २००६ साली मिळून १५९ धावा केल्या होत्या. आता या दोन्ही जोडींचा रोहित आणि यशस्वीने मिळून १७ वर्षांचा विक्रम मोडला आहे. यशस्वी जैस्वालने ६१व्या षटकात जेसन होल्डरच्या चेंडूवर चौकार मारून सेहवाग आणि जाफरची भागीदारी मागे टाकत नवा विक्रम केला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने यजमानांवर १६२ धावांची आघाडी घेतली आहे. मैदानावर यशस्वी जैस्वाल नाबाद १४६ आणि विराट कोहली ३६ धावांवर खेळत आहे.

हेही वाचा: IND vs WI: यशस्वी जैस्वालचे शतक होताच ड्रेसिंग रूममध्ये एकच जल्लोष, कोहलीपासून द्रविडपर्यंत सर्वांनी केले अभिवादन, पाहा Video

वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय सलामीची सर्वात मोठी भागीदारी

२०९* – रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल, रॉसियो, २०२३

२०१ – वीरेंद्र सेहवाग आणि संजय बांगर, मुंबई वानखेडे, २००२

१५९ – वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर, ग्रॉस आइलेट, २००६

१५३ – सुनील गावसकर आणि चेतन चौहान, मुंबई वानखेडे, १९७८

१३६- सुनील गावसकर आणि अंशुमन गायकवाड, किंग्स्टन, १९७६

Story img Loader