Suryakumar Yadav form in ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिला सामना गुरुवारी खेळला गेला. टीम इंडियाचा स्फोटक मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव या सामन्यात चर्चेत होता. याचे कारण त्याची झंझावाती फलंदाजी नसून त्याची जर्सी होती. वास्तविक, सूर्यकुमार यादव पहिल्या वन डेत त्याची जर्सी नव्हे तर सहकारी खेळाडू संजू सॅमसनची जर्सी घालून खेळताना दिसला होता. तोच प्रकार शनिवारी झालेल्या झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला. त्यात पुन्हा त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्यकुमारने असे का केले हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. अशा परिस्थितीत सूर्या संजूची जर्सी घालून का खेळत होता? हेही समोर आले आहे. डीडी स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात सूत्रसंचालक रमण भानोतने यामागील कारण सांगितले. तो म्हणाला की, “टी-शर्टचा आकार आणि नवीन टी-शर्ट येण्यास झालेला विलंब यामुळे सूर्यकुमार यादव पहिल्या दोन सामन्यांमध्ये संजू सॅमसनची जर्सी घालून वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरला.”

रमण भानोत डीडी स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात क्रिकेट तज्ञ माजी खेळाडू अंजुम चोप्राशी बोलताना म्हणाला की, “सामन्याच्या आदल्या दिवशी यादवने संघ व्यवस्थापनाला त्याच्या जर्सीच्या आकाराची माहिती दिली. त्याच्यासोबत फोटोशूट करण्यात जरी तो यशस्वी झाला असला तरी, त्याने त्याच्या जर्सीचा आकार बदलण्याची विनंती केली. सामन्याच्या दिवशी यादवला दिलेली जर्सी ‘मोठ्या’ ऐवजी ‘मध्यम’ आकाराची निघाली.”

हेही वाचा: Rohit Sharma: हिटमॅनवर कॅप्टन्सीचे प्रेशर? वर्ल्डकप आधीच रोहित शर्माचे उडाले डोक्यावरील केस, फोटो व्हायरल

यावर अंजुम चोप्रा म्हणाली की, “पहिले दुसऱ्याची जर्सी जरी राहिली तरी त्याच्या पाठीवर पांढरी पट्टी लावली जात असे किंवा पूर्ण कोरी जर्सी इमर्जन्सीसाठी तयार करून ठेवलेली असे. आता संजूचा टी-शर्ट त्याला झाला म्हणून ठीक आहे नाहीतर…” यानंतर एकच हशा पिकला.

सूर्यकुमार यादव वन डेत सतत फ्लॉप होत आहे

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव फ्लॉप दिसला. टी२० चा नंबर वन फलंदाज सूर्या अनेक दिवसांपासून एकदिवसीय सामन्यांमध्ये अपयशी ठरत आहे. अशा परिस्थितीत त्याच्या वन डे संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. जर्सीबरोबर त्याचा फॉर्मही त्याला सापडत नाही आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादवला २५ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने केवळ २५ धावा करता आल्या. याशिवाय पहिल्या वनडेतही सूर्या फ्लॉप झाला, जिथे त्याने २५ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह केवळ १९ धावा केल्या. सूर्याला बऱ्याच दिवसांपासून वन डेत मोठी खेळी खेळता आलेली नाही.

हेही वाचा: IND vs WI: टीम इंडिया दोन्ही आघाड्यांवर सपशेल अपयशी! वेस्ट इंडिजचा भारतावर सहा विकेट्सने विजय, मालिकेत १-१ अशी बरोबरी

वेस्ट इंडिजपूर्वी सूर्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळताना दिसला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सूर्याला लागोपाठ तीनही डावात गोल्डन डकचा बळी मिळाला. ऑस्ट्रेलियापूर्वी तो न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत दिसला होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सूर्याने वनडेतील शेवटचे अर्धशतक झळकावले. सूर्याने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये २३ डाव खेळले असून त्यात त्याने केवळ २ अर्धशतके झळकावली आहेत. सूर्या आतापर्यंत २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या सर्व एकदिवसीय मालिकेचा भाग आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi suryakumar yadav who is continuously flopping in odis should not get a chance now avw