IND vs WI 2nd T20 News in Marathi, 01 August 2022 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी २० सामना सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे खेळवला गेला. हा सामना वेस्ट इंडीजने पाच गडी राखून जिंकला आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली होती. १९.४ षटकांमध्ये १३८ धावांवर भारताचे सर्व गडी बाद झाले. विजयासाठी १३९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या यजमानांनी १९.२ षटकांमध्ये पाच गड्यांच्या बदल्यात विजय मिळवला.

Live Updates

India vs West Indies 2nd T20 Live : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज टी २० सामन्यातील सर्व अपडेट्स

02:19 (IST) 2 Aug 2022
वेस्ट इंडीजचा पाचवा गडी बाद

रोव्हमन पॉवेलच्या रुपात वेस्ट इंडीजचा पाचवा गडी बाद झाला आहे. अर्शदीप सिंगने त्याला त्रिफळाचित केले.

01:48 (IST) 2 Aug 2022
वेस्ट इंडीजचा तिसरा गडी बाद

रविंद्र जडेजाने शिमरॉन हेटमायरला बाद करून विंडीजला तिसरा धक्का दिला आहे.

01:47 (IST) 2 Aug 2022
ब्रँडन किंगचे अर्धशतक

ब्रँडन किंगने ४० चेंडूत शानदार अर्धशतक पूर्ण केले आहे. विंडीजला विजयासाठी ५६ धावांची आवश्यकता आहे.

01:33 (IST) 2 Aug 2022
कर्णधार निकोलस पूरन बाद

रविचंद्रन अश्विनने कर्णधार निकोलस पूरनला बाद केले आहे. वेस्ट इंडीजच्या ९.४ षटकांमध्ये ७१ धावा झाल्या आहेत.

01:16 (IST) 2 Aug 2022
वेस्ट इंडीजचा पहिला गडी बाद

वेस्ट इंडीजचा पहिला गडी बाद झाला आहे. कायले मेयर्स ८ धावा करून बाद झाला.

01:10 (IST) 2 Aug 2022
पाच षटकांमध्ये विंडीजच्या बिनबाद ३४ धावा

पाच षटकांमध्ये विंडीजच्या बिनबाद ३४ धावा झाल्या आहेत.

00:49 (IST) 2 Aug 2022
वेस्ट इंडीजच्या डावाला सुरुवात

वेस्ट इंडीजच्या डावाला सुरुवात झाली आहे. सलामीवीर मैदानात उतरले आहेत.

00:41 (IST) 2 Aug 2022
विंडीजसमोर विजयासाठी १३९ धावांचे लक्ष्य

विंडीजसमोर भारताने विजयासाठी १३९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

00:32 (IST) 2 Aug 2022
ओबेड मॅककॉयचा पाचवा बळी

ओबेड मॅककॉयने आजच्या सामन्यात पाचवा बळी मिळवला आहे. भारताची अवस्था १९ षटकांमध्ये आठ बाद १२९ अशी झाली आहे.

00:29 (IST) 2 Aug 2022
दिनेश कार्तिकच्या रुपात भारताचा सातवा गडी बाद

दिनेश कार्तिकच्या रुपात भारताचा सातवा गडी बाद झाला आहे.

00:08 (IST) 2 Aug 2022
भारताचा पाचवा गडी बाद

हार्दिक पंड्याच्या रुपात भारताचा पाचवा गडी बाद झाला आहे. भारताच्या १४ षटकांमध्ये पाच बाद १०५ धावा झाल्या आहेत.

23:58 (IST) 1 Aug 2022
भारताच्या १२ षटकांमध्ये चार बाद ९६ धावा

भारताच्या १२ षटकांमध्ये चार बाद ९६ धावा झाल्या आहेत. रविंद्र जडेजा १७ तर हार्दिक पंड्या २८ धावांवर खेळत आहेत.

23:37 (IST) 1 Aug 2022
भारताचा चौथा गडी बाद

ऋषभ पंतच्या रुपात भारताचा चौथा गडी बाद झाला आहे. त्याने १२ चेंडूत २४ धावा केल्या. भारताची अवस्था सात षटकांमध्ये चार बाद ६२ अशी झाली आहे.

23:27 (IST) 1 Aug 2022
पाच षटकांमध्ये भारताच्या तीन बाद ४८ धावा

पाच षटकांमध्ये भारताच्या तीन बाद ४८ धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

23:26 (IST) 1 Aug 2022
अल्झारी जोसेफचा भारताला तिसरा धक्का

अल्झारी जोसेफने श्रेयस अय्यरला बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. भारताची अवस्था तीन बाद ४० अशी झाली आहे.

23:13 (IST) 1 Aug 2022
भारताला दुसरा धक्का

ओबेड मॅककॉयने तिसऱ्या षटकात भारताचा दुसरा गडी बाद केला आहे. भारताची अवस्था दोन षटकांमध्ये दोन बाद १७ अशी झाली आहे.

23:11 (IST) 1 Aug 2022
दुसऱ्या षटकात १७ धावा

अल्झारी जोसेफने फेकलेल्या दुसऱ्या षटकात भारतीय फलंदाजांनी १७ धावा जमवल्या.

23:03 (IST) 1 Aug 2022
रोहित शर्मा शून्यावर बाद

ओबेड मॅककॉयने डावाच्या पहिल्याच चेंडूवर भारताला धक्का दिला आहे. कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला आहे.

23:01 (IST) 1 Aug 2022
भारताची फलंदाजी सुरू

भारताची फलंदाजी सुरू झाली असून सलामीवीर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव मैदानात उतरले आहेत.

22:41 (IST) 1 Aug 2022
आवेश खानला संधी

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग.

वेस्ट इंडीजचा संघ: कायले मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, डेव्हॉन थॉमस, जेसन होल्डर, अकिल होसेन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, ओबेड मॅककॉय

22:38 (IST) 1 Aug 2022
नाणेफेक जिंकून विंडीजचा गोलंदाजीचा निर्णय

वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

21:36 (IST) 1 Aug 2022
सामन्याच्या वेळेत पुन्हा बदल

सामन्याच्या वेळेत पुन्हा बदल केल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११ वाजता सामना सुरू होईल.

21:09 (IST) 1 Aug 2022
लॉजिस्टिक समस्यांमुळे झाला उशीर

त्रिनिदादहून सेंट किट्समध्ये संघाचे महत्त्वपूर्ण सामान येण्यास लक्षणीय विलंब झाला. त्यामुळे सामना दोन तास उशीरा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Story img Loader