IND vs WI 4th T20 News in Marathi, 06 August 2022: भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना फ्लोरिडातील लॉडरहिलमधील ‘सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड’वरती झाला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा ५९ धावांच्या फरकाने पराभव केला. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारताकडे ३-१ अशी विजयी आघाडी आली आहे. वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने निर्धारित २० षटकांमध्ये पाच बाद १९१ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा सर्व संघ १९.१ षटकांमध्येच गुंडाळला गेला.

Live Updates

India vs West Indies 4th T20 Live Match Updates: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज टी २० सामन्यातील सर्व अपडेट्स

23:57 (IST) 6 Aug 2022
वेस्ट इंडीजचा सातवा गडी माघारी

अकील होसेनच्या रुपात वेस्ट इंडीजचा सातवा गडी माघारी परतला आहे. १४.१ षटकांमध्ये विंडीजच्या सात बाद १०६ धावा झाल्या आहेत.

23:27 (IST) 6 Aug 2022
विंडीजचा अर्धा संघ तंबूत

भारतीय गोलंदाजांनी विंडीजचा अर्धा संघ तंबूत पाठवला आहे. रोव्हमन पॉवेल २४ धावा करून बाद झाला. विंडीजच्या नऊ षटकांमध्ये पाच बाद ८२ धावा झाल्या आहेत.

23:19 (IST) 6 Aug 2022
वेस्ट इंडीजचा चौथा गडी बाद

सलामीवीर कायले मेयर्स १४ धावा करून माघारी परतला आहे. विंडीच्या सात षटकांमध्ये चार बाद ६४ धावा झाल्या आहेत.

23:11 (IST) 6 Aug 2022
कर्णधार निकोलस पूरन बाद

कर्णधार निकोलस पूरनच्या रुपात विंडीजचा तिसरा गडी बाद झाला आहे. त्याने आठ चेंडूत २४ धावा केल्या. विंडीजची अवस्था पाच षटकांमध्ये तीन बाद ४९ अशी झाली आहे.

23:02 (IST) 6 Aug 2022
विंडीजचा दुसरा गडी स्वस्तात माघारी

भारतीय गोलंदाज आवेश खानने विंडीजला सलग दोन धक्के दिले आहेत. डेव्हॉन थॉमस अवघी एक धाव करून बाद झाला आहे. विंडीजच्या ३.१ षटकांमध्ये दोन बाद २३ धावा झाल्या आहेत.

22:55 (IST) 6 Aug 2022
वेस्ट इंडीजला पहिला धक्का

ब्रँडन किंगच्या रुपात वेस्ट इंडीजला पहिला धक्का बसला आहे. आवेश खानने त्याला १३ धावांवर माघारी धाडले. विंडीजच्या दोन षटकांमध्ये एक बाद १८ धावा झाल्या आहेत.

22:44 (IST) 6 Aug 2022
वेस्ट इंडीजच्या फलंदाजीला सुरुवात

वेस्ट इंडीजच्या फलंदाजीला सुरुवात झाली असून सलामीवीर मैदानात उतरले आहेत.

22:06 (IST) 6 Aug 2022
१५ षटकांमध्ये भारताच्या चार बाद १४६ धावा

१५ षटकांमध्ये भारताच्या चार बाद १४६ धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत ४४ धावा करून बाद झाला.

21:48 (IST) 6 Aug 2022
दीपक हुडा स्वस्तात बाद

दीपक हुडाच्या रुपात भारताचा तिसरा गडी बाद झाला आहे. त्याने २१ धावा केल्या.

21:36 (IST) 6 Aug 2022
१० षटकांमध्ये भारताच्या दोन बाद ९६ धावा

१० षटकांमध्ये भारताचा दोन बाद धावा ९६ झाल्या आहेत. दीपक हुडा आणि ऋषभ पंतने फटकेबाजी सुरू केली आहे.

21:27 (IST) 6 Aug 2022
आठ षटकांमध्ये भारताचा दोन बाद ७७ धावा

आठ षटकांमध्ये भारताचा दोन बाद धावा ७७ झाल्या आहेत. दीपक हुडा आणि ऋषभ पंत डावाला आकार देण्याचा प्रयत्न करत आहेत.

21:18 (IST) 6 Aug 2022
सूर्यकुमार यादव बाद

स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव बाद झाला आहे. तो २४ धावा करून माघारी परतला. भारताच्या सहा षटकांमध्ये दोन बाद ६५ धावा झाल्या आहेत.

21:10 (IST) 6 Aug 2022
भारताला पहिला धक्का

कर्णधार रोहित शर्माच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला आहे. अकील होसेनने त्याला त्रिफळाचित केले. पाच षटकांमध्ये भारताच्या एक बाद ५४ धावा झाल्या आहेत.

21:01 (IST) 6 Aug 2022
मॅकॉयच्या षटकात २५ धावा

रोहित शर्मा आणि सूर्यकुमारच्या जोडीने ओबेड मॅकॉयच्या एका षटकात २५ धावा जमवल्या.

21:00 (IST) 6 Aug 2022
रोहित-सूर्यकुमारची फटकेबाजी सुरू

कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने फटकेबाजी सुरू केली आहे. तीन षटकांमध्ये भारताच्या बिनबाद ३९ धावा झाल्या आहेत.

20:47 (IST) 6 Aug 2022
भारताची फलंदाजी सुरू

भारताची फलंदाजीला सुरुवात झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव सलामीसाठी मैदानात उतरले आहेत.

20:25 (IST) 6 Aug 2022
भारतीय संघात दोन बदल

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग</p>

वेस्ट इंडीज: ब्रँडन किंग, कायले मेयर्स, निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, डेव्हॉन थॉमस (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, डॉमिनिक ड्रेक्स, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेड मॅकॉय

20:22 (IST) 6 Aug 2022
नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

19:50 (IST) 6 Aug 2022
फ्लोरिडामध्ये पावसाचे वातावरण

फ्लोरिडामध्ये पावसाचे वातावरण असून काही तासांपूर्वी तिथे पाऊस पडला आहे. ओल्या मैदानामुळे नाणेफेकीला उशीर झाला आहे.