टी-२०, वन-डे पाठोपाठ विराट कोहलीच्या भारतीय संघाने जेसन होल्डरच्या वेस्ट इंडिज संघावर कसोटी मालिकेतही निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. अँटीग्वा कसोटीत बाजी मारल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जमैका कसोटीतही विंडीजला झटपट गुंडाळत सामना आपल्या खिशात घातला. भारतीय संघाने कसोटीत २५७ धावांनी बाजी मारत मालिकेत २-० अशी सरशी साधली. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या हनुमा विहारीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हनुमा विहारीने दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात १११ धावा तर दुसऱ्या डावात नाबाद ५३ धावा केल्या. पहिल्या सामन्यात देखील त्याने उत्तम खेळ केला होता, पण त्याला शतकाने हुलकावणी दिली होती. ९३ धावांवर तो बाद झाला होता. त्या खेळीनंतर तो काहीसा हताश होऊन तंबूत परतला होता, पण कर्णधार विराट कोहलीने त्याच्याशी ज्या प्रकारे संवाद साधला त्यामुळे त्याला प्रेरणा मिळाली. त्याने टाईम्स ऑफ इंडिया डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की मी जेव्हा ९३ धावांवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतलो तेव्हा विराट माझ्या हुकलेल्या शतकाबद्दल किंवा माझी काय चुक झाली याबाबात काहीही बोलला नाही. उलट त्याने मला पाठीवर शाबासकी देत ‘अप्रतिम खेळी’ इतकेच म्हणाला. त्या या शब्दांमुळे मला खूपच दिलासा मिळाला आणि ज्यावेळी मी पुन्हा मैदानात उतरलो त्यावेळी मला शतक ठोकता आले, असे हनुमाने स्पष्ट केले.

हनुमा विहारीने वेस्ट इंडिज दौऱ्यात २ कसोटी सामन्यात ९६.३३ च्या सरासरीने १ शतक आणि २ अर्धशतक झळकावत २८९ धावा केल्या. दरम्यान, वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे.