IND vs WI 1st Test 2023: टीम इंडियाच्या वेस्ट इंडिजमधून दररोज नवीन व्हिडीओ समोर येत आहेत जिथे रोहितचे पुरुष कसोटी मालिकेसाठी जोरदार तयारी करण्यात व्यस्त आहेत. या एपिसोडमध्ये टीमच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक नवीन व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, जो खूप व्हायरल होत आहे आणि यामध्ये भारतीय टीम एक खास कसरत करताना दिसत आहे.

यशस्वी जैस्वालचे टीम इंडियात पदार्पण होणार

दुसरीकडे, १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेशी संबंधित एक अहवाल समोर येत आहे, जर या अहवालावर विश्वास ठेवला तर पहिल्यांदाच टीम इंडियात समावेश झालेला युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याला आजच्या सामन्यात संधी मिळू शकते आणि खुद्द कर्णधार रोहित शर्माने सामन्याआधी पत्रकार परिषदेत सांगितले. यासोबतच संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडही सध्या जैस्वालसोबत नेटमध्ये काम करत आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी टिप्स देत आहे.

सरावा दरम्यान टीम इंडियाचीने मजा केली

टीम इंडियाच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेला व्हिडीओ आहे.जिथे सर्व खेळाडू बूमरँगपेक्षा वेगळ्या पद्धतीने सराव करताना दिसले.दरम्यान, विराट कोहली आपल्या सहकाऱ्यांसोबत मजा मस्ती करत होता.इशान किशन आणि के.एस. भरत हे देखील या अनोख्या व्यायामाचा भाग होते.

रोहित शर्मा-विराट कोहली-अजिंक्य रहाणे यांच्यासमोर वेगवेगळी आव्हाने असतील

रोहित शर्मा-विराट कोहली-अजिंक्य रहाणे या तिघांचीही आपापली आव्हाने वेगळी असतील. ५० षटकांच्या विश्वचषकात रोहितसाठी बरेच काही पणाला लागणार आहे. विश्वचषकानंतरची कसोटी कारकीर्द जिवंत ठेवण्यासाठी त्याला मालिकेतील पहिले दोन सामने जिंकावे लागतील आणि फलंदाजीतही योगदान द्यावे लागेल. विराटला काही मोठ्या खेळी कराव्या लागणार आहे. ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर कॅरेबियन गोलंदाजांना त्याची कमजोरी जाणवू शकते. तसेच, अजिंक्य रहाणेला त्याच्या फॉर्ममध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे.

हेही वाचा: IND vs WI: काय म्हणता, १२ वर्षात कोहली बनला दिग्गज अन् द्रविड तरुण झाला? कसे ते पाहा Video आणि तुम्हीच ठरवा!

सामना कुठे पाहू शकता?

भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर २ कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यानंतर दोघांमध्ये ५ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. दूरदर्शनने अधिकृतपणे माहिती दिली की वन डे आणि टी२० मालिकेचे सामने डी.डी. स्पोर्ट्स लाइव्हवर थेट प्रक्षेपित केले जातील. सामने एकूण ७ भाषांमध्ये प्रसारित केले जातील. या सामन्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड अ‍ॅप आणि जिओ सिनेमावर केले जाईल. सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल.