Ishan Kishan viral Video: एम.एस. धोनी जेव्हा क्रिकेट खेळायचा तेव्हा अशा अनेक गोष्टी स्टंपच्या माईकमध्ये टिपल्या जायच्या, ज्या ऐकून चाहते आनंदित व्हायचे. धोनीनंतर ऋषभ पंतही यष्टिरक्षण करताना अनेक मजेशीर गोष्टी सांगून फलंदाजाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत असे. आता या यादीत इशान किशनचे नाव जोडले गेले आहे. वास्तविक, इशानने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पण केले. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच इशानने आतापर्यंत दोन झेल घेतले आहेत. त्यात विकेटच्या मागून अनेक मजेशीर कमेंट करताना त्त्याचा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये इशान अनुभवी विराट कोहलीला सूचना देताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये इशान विराट कोहलीला सांगत आहे की, त्याला कुठे फिल्डिंग करायची आहे. हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये धमाल उडवून देत आहे. त्याचवेळी, व्हिडीओमध्ये इशान विरोधी संघाच्या फलंदाजांना त्रास देण्यासाठी अनेक युक्त्या लढवत आहे, जे ऐकून तुम्हीलाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इशान किशनला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्या कसोटी सामन्यात विकेटकीपिंग करताना इशानने दोन झेल घेतले. सर्वप्रथम, इशानने यष्टिरक्षक रेमन रेफरच्या रुपात आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिला झेल घेतला आणि दुसरा झेल जोशुआ दा सिल्वाचा घेतला. माहितीसाठी की, जेव्हा इशानने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिला झेल घेतला तेव्हा विराट कोहली स्लिपमध्ये उभा होता.
इशानने शार्दुलच्या चेंडूवर रीफरचा डायव्हिंग कॅच घेतला, हा झेल खूप कठीण होता, पण तरीही इशानने उत्कृष्ट यष्टिरक्षणाचे प्रदर्शन केले आणि एक अप्रतिम झेल घेत आपल्या कारकिर्दीची शानदार सुरुवात केली. इशानने हा अफलातून झेल घेतला तेव्हा कोहलीने त्याला आनंदाने मिठी मारली. या मालिकेतील पहिल्या कसोटीत यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन या दोन युवा भारतीय फलंदाजांनी कसोटी पदार्पण केले. कर्णधार रोहित शर्माने सामन्यापूर्वी पदार्पणाची कॅप यशस्वी जैस्वालला दिली आणि विराट कोहलीने इशान किशनला पदार्पणाची कॅप दिली.
सामन्यात काय झाले?
रोहित आणि यशस्वी यांनी पहिल्या डावात भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी काही अप्रतिम फटके मारले आणि कोणतीही चूक केली नाही. यशस्वी ७३ चेंडूत ४० धावा करून नाबाद आहे. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार मारले आहेत. त्याचबरोबर रोहितने ६५ चेंडूत ३० धावा केल्या आहेत. त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. भारत पहिल्या डावात वेस्ट इंडिजपेक्षा ७० धावांनी पिछाडीवर आहे आणि दुसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, सामन्यात पुनरागमन करण्यासाठी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना कसरत करावी लागणार आहे.