IND vs WI 2023, Virat Kohli & Yashaswi Jaiswal: भारतीय क्रिकेट संघ बार्बाडोसमध्ये सराव करत आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर पहिले दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. त्यातील पहिला सामना १२ जुलैपासून सुरू होईल. विराट कोहलीने मंगळवारी सराव सत्रात प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत बराच वेळ घालवला. नेट सरावातून मैदानावर सराव करण्याआधी कोहलीने युवा फलंदाज यशस्वी जैस्वालसोबत बराच वेळ घालवला. यादरम्यान त्याने यशस्वीला फलंदाजीच्या काही खास टिप्स दिल्या. त्याचा हा व्हिडीओ विमल कुमार यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेसाठी खेळाडूंनी बार्बाडोसमध्ये सराव सुरू केला आहे. विमल कुमारने मंगळवारी शेअर केलेल्या नेट प्रॅक्टिसच्या व्हिडीओमध्ये कोहली नेटमध्ये भारतीय गोलंदाजांचा सामना करत आहे. त्याच्या संघात युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल सराव करताना दिसला, ज्याची प्रथमच कसोटी मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. नेटमध्ये सराव संपल्यानंतर कोहलीने ग्राउंडवर सरावाला जाण्यापूर्वी राहुल द्रविडशी बराच वेळ गप्पा मारल्या. परिस्थिती, हवामान, रणनीती इत्यादींवर चर्चा केल्यानंतर कोहलीने यशस्वीसोबत बराच वेळ घालवला.

सरावादरम्यान यशस्वीला दिला कोहलीने खास गुरुमंत्र

विराट कोहली यशस्वी जैस्वालला फलंदाजीच्या टिप्स देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. द्रविडच्या तुलनेत त्याने यशस्वी जैस्वालसोबत जास्त वेळ घालवला. कोहली हा जगातील अव्वल फलंदाज आहे आणि प्रत्येक खेळाडूला त्याच्यासोबत सराव शेअर करण्याची आणि त्याच्याकडून टिप्स घेण्याची संधी मिळावी असे वाटते. तुम्हाला माहिती आहेच की, यशस्वी जैस्वालने आयपीएलमध्ये सर्वांना खूप प्रभावित केले होते, त्यानंतर डब्ल्यूटीसी फायनलमध्येही त्याची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती. आता त्याचा वेस्ट इंडिज दौऱ्यावरील संघात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा: Best Test Cricketer: कोहली-अश्विन नव्हे, ‘हे’ आहे हरभजनचे ५ आवडते कसोटी क्रिकेटपटू! मात्र नाव लिहिताना असे काही केले की…

हे वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक आहे

भारतीय संघ दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी२० सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा सामना करेल. कर्णधार रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने करणार असून त्यातील पहिला सामना १२ जुलैपासून खेळवला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना २० जुलैपासून सुरू होणार आहे. त्याचवेळी, २७ जुलैपासून एकदिवसीय मालिका सुरू होईल आणि शेवटचा सामना १ ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. त्यानंतर लगेचच टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेला ३ ऑगस्टपासून सुरूवात होणार असून शेवटचा सामना १३ ऑगस्टला असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi virat kohli was seen giving batting tips to young yashasvi jaiswal you can also watch the video avw
Show comments