फ्लोरिडा येथे शनिवारी खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ४ गडी राखून मात केली. विजयासाठी विंडीजने दिलेल्या ९६ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था बिकट झाली होती. ६ गडी गमावल्यानंतर विंडीजचा संघ सामन्यात पुनरागमन करतो की काय असं वाटत असतानाच, फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने षटकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या कामगिरीसह वॉशिंग्टन सुंदरने अनोखा विक्रमही आपल्या नावे केला आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात विकेट घेऊन विजयी धाव काढणारा वॉशिंग्टन सुंदर दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी २०१५ साली बांगलादेशच्या मश्रफी मोर्ताझाने अशी कामगिरी करुन दाखवली होती.

याचसोबत भारताकडून अशी अनोखी कामगिरी करणारा वॉशिंग्टन पहिलाच खेळाडू ठरला आहे.

सामन्याचं पहिलंच षटक टाकत असताना वॉशिंग्टनने कँपबेलचा बळी घेतला. तर फलंदाजीमध्ये भारताचे ६ फलंदाज माघारी परतले असताना, षटकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

अवश्य वाचा – Ind vs WI : पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांची ऐतिहासिक कामगिरी

Story img Loader