भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात १२ जुलैपासून डॉमिनिका येथे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. यासाठी विंडीजने १३ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. १४० किलो वजनाचा फिरकी गोलंदाज अष्टपैलू रहकीम कॉर्नवॉलचाही संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर डावखुरा फिरकीपटू जोमेल वॅरिकनचे १३ सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. ही कसोटी भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांसाठी पुढील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सायकलची सुरुवात करेल. गुडाकेश मोतीच्या दुखापतीमुळे वॉरिकनला संघात स्थान मिळाले आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “मोती सध्या पुनर्वसनात आहे. क्रेग ब्रॅथवेट संघाचे नेतृत्व करेल.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॉर्नवॉलने भारताविरुद्धच कसोटी पदार्पण केले

कॉर्नवॉलने २०१९ मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले. नोव्हेंबर २०२१ पासून तो वेस्ट इंडिजकडून रेड-बॉल क्रिकेट खेळला नाही. तो १४० किलो वजनाचा असून त्याला संघात न घेण्याचे त्यामागील कारण म्हणजे त्याचे वजन आहे. पहिल्या कसोटीसाठी, प्लेइंग-११ मध्ये कोणाचा समावेश करायचा यावर तो आणि वॉरिकन यांच्यात विचार होऊ शकतो. भक्कम भारतीय फलंदाजी विरुद्ध वेस्ट इंडिज संघ तीन पूर्ण वेगवान गोलंदाजांसह जाऊ शकतो. “मोतीच्या दुखापतीमुळे फिरकी गोलंदाजी विभागात वॅरिकन आणि कॉर्नवॉल यांना समान संधी निर्माण झाली आहे”, असे वेस्ट इंडिजचे मुख्य निवडकर्ते डेसमंड हेन्स यांनी सांगितले. ते दोघे यापूर्वी कसोटी सामन्यांमध्ये या कठीण स्तरावर खेळले आहेत.

कर्क मॅकेन्झी आणि अ‍ॅलिक अथानाज या फलंदाजांना पहिली संधी मिळाली

डावखुरा फलंदाज कर्क मॅकेन्झी आणि अ‍ॅलिक अथानाज हे दोन नवे चेहरे संघात आहेत. हेन्स म्हणाले, “बांगलादेशच्या नुकत्याच झालेल्या ‘अ’ संघाच्या दौऱ्यावर मॅकेन्झी आणि अथानाजे यांच्या फलंदाजीने आम्ही खूप प्रभावित झालो. हे दोन युवा खेळाडू आहेत ज्यांनी चांगली कामगिरी करत, मोठ्या परिपक्वतेने खेळत आम्हाला त्यांचा विचार करण्यास भाग पडले. आम्हाला विश्वास आहे की ते संधीस पात्र आहेत. जेडेन सील्स देखील अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्याचवेळी काईल मेयर्सचाही विचार करण्यात आला, मात्र त्याच्यात काही त्रुटी आहेत आणि त्यामुळे त्याला कसोटी संघात ठेवण्यात आले नाही.”

डेसमंड हेन्स काय म्हणाले?

मुख्य निवडकर्ता डेसमंड हेन्स पुढे म्हणाले, “आम्हाला माहित आहे की भारताविरुद्धची कसोटी मालिका आमच्यासाठी आव्हानात्मक असेल कारण आम्ही आयसीसी कसोटी सामना चॅम्पियनशिपचे नवीन चक्र सुरू करत आहोत. आम्हाला संघ तयार करून त्यात सुधारणा करायची आहे. संघ वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या प्री-सीरिज कॅम्पनंतर वेस्ट इंडिजचा संघ रविवारी डॉमिनिकाला पोहोचेल. सामन्याच्या तयारीसाठी तो सोमवारी दुपारी आणि मंगळवारी सकाळी सराव करेल.

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया चषकाचे वेळापत्रक लांबले, हायब्रीड मॉडेलवर पुन्हा विचार होणार? पाकिस्तानचा आडमुठेपणा सुरूच

वेस्ट इंडिजचे खेळाडू भारताविरुद्ध चांगली कामगिरी करतील: ब्रायन लारा

माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लारा म्हणाला,“आम्ही आमच्या पुढील दोन वर्षांच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलची सुरुवात भारताविरुद्धच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या कसोटी सामन्यांनी करणार आहोत. मायदेशात आणि परदेशात भारत हा जगातील अव्वल संघांपैकी एक आहे. आम्ही शिबिर कोठे सुरू केले आणि आता आम्ही कुठे आहोत हे पाहता, मला वाटते की आमचा संघ आणि आमचे खेळाडू योग्य दिशेने जात आहेत.

वेस्ट इंडिजच्या या तरुण संघाचे नेतृत्व क्रेग ब्रॅथवेट करत आहे आणि डॉमिनिकामधील पहिल्या सामन्यापूर्वी आम्ही सर्वजण खूप उत्सुक आहोत. भारत हा एक तगडा प्रतिस्पर्धी आहे आणि मला वाटते की अशा कठीण सामन्यांमध्ये आमच्या युवा संघाला संधी देऊन आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. मला आशा आहे की आम्ही अप्रतिम खेळी करू.”

हेही वाचा: ICC WC 2023 Trophy: क्रिकेट विश्वचषकाची ट्रॉफी पोहचली पँगॉन्ग लेकला, BCCI सचिव जय शाहांनी ट्वीटरवर फोटो केले शेअर

पहिल्या कसोटीसाठी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघ:

क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड, एलिक अथानाज, तेजनारिन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, रेमन रीफ केलर रोच, जोमेल वॅरिकन.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi west indies announced test team to challenge india three new stalwarts got a chance avw
Show comments