India vs West Indies: भारतीय संघ १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यानंतर, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल, त्यानंतर दोघांमध्ये ५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने होतील. वन डे मालिका २७ जुलैपासून तर टी२० मालिका ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दरम्यान, टीम इंडियामध्ये कोणत्याही मालिकेसाठी ‘या’ खेळाडूला संधी देण्यात आलेली नाही आणि आता तो निवृत्तीची घोषणा करू शकतो, असे मानले जात आहे.

दरम्यान, टीम इंडियाचा असा एक क्रिकेटर आहे ज्याला बीसीसीआयने कोणत्याही फॉरमॅटसाठी वेस्ट इंडीज दौऱ्यावर संघात संधी दिलेली नाही. इतकंच नाही तर आता हा दिग्गज खेळाडू राष्ट्रीय संघात पुनरागमन करू शकणार नाही, अस आता त्याच्या चाहत्यांना वाटत आहे.

IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
West Indies Beat England with New Record of Highest Successful Chase in in T20I At Home Soil of 219 Runs WI vs ENG
ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Tim Southee Retirement From Test Cricket After 3 match Home Series Against England Said its tough decision but it is the right one
रोहित-सेहवागपेक्षा सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या गोलंदाजाने जाहीर केली निवृत्ती, ‘हा’ कसोटी सामना अखेरचा
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?
IPL Auction 2025 42 year old James Anderson registers for first time last played T20 in 2014 What is Base Price
IPL Auction 2025: आयपीएल लिलावात दिसणार ४२ वर्षीय खेळाडू, १५ वर्षांपूर्वी खेळला होता अखेरचा टी-२० सामना; ‘या’ संघाचा आहे गोलंदाजी कोच

त्या खेळाडूचे वय ३८ वर्षे आहे

ज्या दिग्गज खेळाडूचा उल्लेख केला जात आहे तो दुसरा कोणी नसून महाराष्ट्राचा केदार जाधव आहे. या 38 वर्षीय अनुभवी खेळाडूला कधीही कसोटी फॉरमॅटमध्ये संधी देण्यात आली नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ३८ वर्षांच्या केदार जाधवची कारकीर्दही इतकी चमकली नाही. २०२० नंतर केदार जाधवची कोणत्याही फॉरमॅटसाठी संघात निवड झालेली नाही. ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध वन डे खेळताना तो अखेरचा टीम इंडियाच्या जर्सीत दिसला होता.

हेही वाचा: K. Shrikant: “तो जर असता तर टीम इंडिया चॅम्पियन…”, माजी सलामीवीर श्रीकांत यांनी भारताच्या ‘या’ खेळाडूची काढली आठवण

निवृत्तीची घोषणा करणार?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी नुकतीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती, ज्यामध्ये निवडकर्त्यांनी केदार जाधवचा विचार देखील केलेला नाही. आता हा दिग्गज अष्टपैलू खेळाडू भारतीय संघात पुन्हा येऊ शकणार नाही, असे स्पष्ट संकेत निवडकर्त्यांनी दिले आहेत. जुलैमध्ये होणाऱ्या या मालिकेपूर्वी केदार जाधव निवृत्तीची घोषणा करू शकतो, अशीही अटकळ बांधली जात आहे. आपल्या कारकिर्दीत ७३वन डे आणि ९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या केदार जाधवसाठी जरी हा निर्णय सोपा नसला तरी तो घेऊ शकतो, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

विराटच्या कर्णधारपदाखाली करिअर चमकले

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली केदार जाधवची कारकीर्द बहरली. यापूर्वी, केदारने अनुभवी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली फक्त ९ एकदिवसीय सामने खेळले पण विराटने त्याला ५४ वन डेत संधी दिली. यादरम्यान केदारने ४१.०७ च्या सरासरीने धावा केल्या. रोहित शर्माने त्याला केवळ ७ एकदिवसीय सामन्यांमध्ये संधी दिली आणि त्यात तो केवळ ८६ धावाच करू शकला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली केदार जाधवने ३ एकदिवसीय सामने खेळले आणि एका शतकाच्या जोरावर एकूण १२६ धावा केल्या. अशा स्थितीत विराटच्या नेतृत्वाखाली केदारची कारकीर्द चमकली, असे स्पष्टपणे मानता येईल.

हेही वाचा: WC 2023: पीसीबीच्या आडमुठेपणावर माजी खेळाडू वसीम अक्रम भडकले, म्हणाले, “तुम्ही बोलाल तिथे खेळू पण…”

अशी आहे केदार जाधवची कारकीर्द

या मधल्या फळीतील फलंदाजाने आपल्या कारकिर्दीत ७३ एकदिवसीय आणि ९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तो आयपीएलमधील अनुभवी महेंद्रसिंग धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळताना दिसला होता. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २ शतके आणि ६ अर्धशतकांच्या मदतीने १३८९ धावा केल्या, टी२० आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये त्याने एका अर्धशतकासह १२२ धावा केल्या आहेत.