Yashasvi Jaiswal And Ruturaj Gaikwad BCCI Podcast: टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने करणार आहे. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांचा प्रथमच भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही खेळाडूंनी यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. या दोन्ही खेळाडूंना कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते पण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, हे दोन्ही खेळाडू बीसीसीआयच्या वेगळ्या प्रोजेक्टमध्ये पदार्पण करणार आहेत. खुद्द बीसीसीआयने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जैस्वाल -गायकवाड यांचे पदार्पणहोऊ शकते

वास्तविक बीसीसीआय आपले पॉडकास्ट सुरू करणार आहे आणि त्याचा पहिला भाग ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल करणार आहेत. बीसीसीआयने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामध्ये यशस्वी आणि ऋतुराज पॉडकास्टची माहिती शेअर करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये ऋतुराज म्हणाला, “ऐक यशस्वी, आपण दोघे नवीन आहोत, हे दृश्य आणि माध्यमही नवीन आहे. आणखी एक नवीन गोष्ट म्हणजे बीसीसीआय पॉडकास्ट येत आहे. चल जाऊया नवीन गोष्ट करूया. आपण दोघेच पहिला एपिसोड करू.” प्रत्युत्तरात यशस्वी म्हणाले, “चला करूया.” याचा अर्थ हे दोघेही बीसीसीआय पॉडकास्टमध्ये पदार्पण करणार आहेत.

हेही वाचा: Rohit Sharma: “लोकांनी मर्यादा ओलांडली…”, कर्णधार रोहित शर्माच्या समर्थनार्थ हरभजन सिंग टीकाकारांवर भडकला

‘या’ खेळाडूला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळू शकते

यशस्वी जैस्वाल हा प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळण्याच्या शर्यतीत मोठा दावेदार मानला जात आहे. यशस्वीला अलीकडेच आयपीएल २०२३च्या १६व्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसला. त्याने दमदार कामगिरी केली आणि तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा (१४ सामन्यांत ६२५ धावा) होता. यशस्वीने आतापर्यंत १५ प्रथम श्रेणी सामने, ३२ लिस्ट ए आणि ५७ टी२० सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतकही ठोकले आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९, लिस्ट ए मध्ये ५ आणि टी२० मध्ये एक शतक झळकावले आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १८४५ धावा, लिस्ट ए मध्ये १५११ आणि टी२० मध्ये १५७८ धावा जोडल्या आहेत.

ऋतुराज गायकवाड यापूर्वीही संघाचा भाग झाला होता

ऋतुराज गायकवाडने भारतासाठी एक वन डे आणि ९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अशा स्थितीत तो आता कसोटीत पदार्पणाची वाट पाहत आहे. ऋतुराज गायकवाडने अलीकडच्या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा केल्या आहेत. ऋतुराजने आयपीएल २०२३मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने ४ अर्धशतकांच्या मदतीने एकूण ५९० धावा केल्या होत्या.

हेही वाचा: IND vs WI: “टेस्टलाही बनवली आयपीएलची…”; BCCIने केली वेस्ट इंडीज मालिकेपूर्वी टीम इंडियाची जर्सी लॉन्च, चाहत्यांनी केले ट्रोल

वेस्ट इंडिज विरुद्ध भारतीय कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के.एस. भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.