Yashasvi Jaiswal scored a century and a half on the third day of the first Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळवला जात आहे. शुक्रवारी (१४ जुलै) सामन्याच्या तिसर्‍या दिवशी टीम इंडिया पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने आपले दीडशतक पूर्ण केले. जैस्वालने या दीडशतकाच्या जोरावर एक विक्रम केला आहे. त्याने ३६१ चेंडूचा सामना करताना १५ चौकारांच्या मदतीने आपले दीडशतक शतक पूर्ण केले.

यशस्वी जैस्वालने डॉमिनिका कसोटीत १५० धावा पूर्ण केल्या आहेत. भारताच्या पदार्पणात हा आकडा गाठणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी शिखर धवनने पराक्रम केला आहे. धवनने २०१३ मध्ये मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८३ धावा केल्या होत्या. त्याच्या अगोदर रोहित शर्माने आपल्या पदार्पणात १७७ धावांची खेळी साकारली होती.

KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
Virat Kohli comes now it seems like he can be dismissed without any issues says Aakash Chopra
Virat Kohli : ‘आता असं वाटतं की विराटला कोणत्याही अडचणीशिवाय…’, भारताच्या रनमशीनबद्दल आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य
How India lost in Test matches against New Zealand Where exactly did the Indian team go wrong
रोहित, विराट सुमार; युवकांतही सातत्याचा अभाव! भारतीय संघाचे नेमके चुकले कुठे?ऑस्ट्रेलियाविरुद्ध कितपत सज्ज?

११६ षटकांनंतर भारतीय संघाने २ गडी गमावून ३२१ धावा केल्या. त्याचबरोबर भारताने आता पहिल्या डावात १७१ धावांची आघाडी घेतली. यशस्वी जैस्वालने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दीडशतक झळकावले.

यशस्वी जैस्वालच्या वडिलांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते आपल्या मुलाचे द्विशतक पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त करत आहे. कावड यात्रेला निघालेल्या यशस्वीच्या वडिलांनी सांगितले की, संपूर्ण कुटुंबात आनंद आहे. भदोही जिल्हा आनंदात आहे. माझ्या मुलाने द्विशतक झळकावे आणि यूपीचे नाव उज्वल करावे, अशी माझी इच्छा आहे. त्याचे द्विशतक पूर्ण व्हावे, यासाठी मी बाबांच्या धाममध्ये हे व्रत मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्याच्या मेहनतीला यश मिळो.

यशस्वी जैस्वालचा क्रिकेटपटू बनण्याचा प्रवास संघर्षमय राहिला आहे –

यशस्वी जैस्वाल लहान वयात मुंबईत आला होता. क्रिकेट खेळण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. अगदी पाणी पुरी सुद्धा विकावी लागली. त्याला कागदाच्या तंबूत राहावे लागले. तो दिवसभर खेळायचा आणि रात्री स्वतः स्वंयपाक करुम पोट भरायचा. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत संघाला चॅम्पियन बनवल्यानंतर यशस्वीने रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, इराणी आणि आयपीएलमधील आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळेच त्याला टीम इंडियात संधी मिळाली आणि त्याने आता निवडकर्त्यांचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले.