Virat Kohli Accuse Windies Bowling Action: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात विंडसर पार्क डॉमिनिका येथे कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने २ विकेट्स गमावून ३१२ धावा केल्या आहेत. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळात शुबमन गिल बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत कोहलीने ९६ चेंडूंचा सामना करत ३६ धावा केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, विरोधी संघाचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटच्या बॉलिंग अ‍ॅक्शनमुळे विराट कोहली संतप्त दिसत होता. विराट कोहलीच्या मते क्रेग ब्रॅथवेटची गोलंदाजीची कृती कायदेशीर नाही आणि तो फेकी गोलंदाजी करत आहे. ब्रॅथवेटच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी जात असताना कोहलीला हे लक्षात आले आणि त्यानंतर त्याचा आवाज स्टंप माईकवर पकडला गेला. कोहली म्हणाला, “ये तो भट्टा फेंक रहा है.”

याआधीही ब्रॅथवेटच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनवर प्रश्न उपस्थित झाले आहेत

ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही क्रेग ब्रॅथवेटच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भारताने २०१७ आणि २०१९ मध्ये वेस्ट इंडिजचा दौरा केला होता, त्यादरम्यान ब्रॅथवेटवर संशयास्पद गोलंदाजी कृतीचा आरोप होता. मात्र, अंपायर आणि रेफरी यांच्याकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

माहितीसाठी की, कोहलीने ब्रॅथवेटच्या बॉलिंग अ‍ॅक्शनची तक्रार अंपायरकडे केली नाही, ज्यामुळे गोलंदाजाला गोलंदाजी करण्यापासून रोखले गेले नाही. दिवसाचा खेळ संपेपर्यंत कॅरेबियन गोलंदाजाने ६ षटकांत १२ धावा दिल्या असून त्याला विकेट्स घेण्यात यश मिळाले नाही. विशेष म्हणजे, वेस्ट इंडिज संघाने आतापर्यंत एकूण ९ गोलंदाजांचा वापर केला आहे, परंतु असे असूनही त्यांना केवळ २ विकेट्स घेण्यात यश मिळाले.

हेही वाचा: IND vs WI: शतकवीर यशस्वी जैस्वालचे ड्रेसिंग रूममध्ये भव्य स्वागत, रोहितपासून द्रविडपर्यंत सर्वांनी केला सॅल्युट, पाहा Video

विंडसर कसोटीत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या १५० धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने रोहित शर्मा (१०३) आणि यशस्वी जैस्वाल (१४३*) यांच्या शतकांच्या जोरावर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत २ विकेट्स गमावून ३१२ धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवशी विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी भारतीय डावाचे सुरुवात करेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi ye toh bhatta phenka raha hai virat kohli furious at caribbean players bowling action watch the video avw