Shubman Gill Century: हरारे येथे भारत विरुद्ध झिम्बाब्वे तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा धडाकेबाज फलंदाज शुबमन गिलने जोरदार फटकेबाजी केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपले पहिलवहिले शतक केले आहे. शुबमनने ९७ चेंडूत १३० धावांची खेळी केली. आजच्या सामन्यात शुबमन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शिखर धवन आणि केएल राहुलने डावाची सुरुवात केली. केएल राहुल ३० धावा करून बाद झाल्यानंतर शुबमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने सुरुवातीपासूनच झटपट धावा केल्या. ८२ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपले पहिले शतक पूर्ण केले. शुबमन गिल आणि ईशान किशन जोडीने तिसऱ्या गड्यासाठी १२७ चेंडूत १४० धावांची भागीदारी केली.

वेस्ट इंडीज दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत शुभमन गिलला शतक झळकावण्याची संधी होती. पावसाच्या व्यत्यय आलेल्या सामन्यात त्याने ९८ धावा केल्या होत्या. याशिवाय, २०२०-२१मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामन्यात तो ९१ धावांवर बाद झाला होता. त्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय अद्याप क्रिकेटमध्ये शतक झाले नव्हते. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याने ही कसर भरून काढली.

हेही वाचा – IND vs ZIM 3rd ODI: गब्बरने घातली ठाकूरची जर्सी! चाहत्यांनी शेअर केले मजेशीर मीम्स

दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शुबमन गिलला ‘न्यूझीलंड अ’विरुद्ध होणाऱ्या मालिकेत ‘भारत अ’ संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. न्यूझीलंड अ संघ सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. सध्या शुबमन गिल अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यातील तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ६४, ४३ आणि नाबाद ९८ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने नाबाद ८२ धावांची खेळी केली तर दुसऱ्या सामन्यात ३३ धावा केल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs zim 3rd odi shubman gill hits maiden international century vkk