Tushar Deshpande T20 International Debut Against Zimbabwe : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात तुषार देशपांडेने टीम इंडियासाठी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या मालिकेत भारताकडून पदार्पण करणारा तो पाचवा खेळाडू ठरला आहे. तुषार देशपांडे आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण करणारा भारताचा ११५वा खेळाडू ठरला आहे.

तुषार देशपांडेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण –

नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही विकेट पूर्णपणे ताजी दिसत आहे. मला वाटते की या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळू शकते. डेथ ओव्हर्समध्ये आम्हाला आमची गोलंदाजी आणखी सुधारण्याची गरज असल्याने आम्ही प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. या सामन्यातून तुषार देशपांडे पदार्पण करत असून त्याला आवेश खानच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.’

Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता
Travis Head Fastest Century in Day Night Test Match IND vs AUS Adelaide Test
Travis Head: ट्रॅव्हिस हेडचे डे-नाईट कसोटीत सर्वात जलद शतक, स्वत:चा रेकॉर्ड मोडत केली मोठी कामगिरी; भारत बॅकफूटवर
Kagiso Rabada Bat Broke in t20 parts on Lahiru Kumara Ball in SA vs SL 2nd Test Watch Video
SA vs SL: चेंडूच्या वेगासमोर बॅटचे झाले दोन तुकडे, थोडक्यात वाचला कगिसो रबाडाचा हात; VIDEO होतोय व्हायरल

तुषार देशपांडे हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू आहे. तुषार देशपांडेने आयपीएल २०२४ च्या १३ सामन्यात १७ विकेट्स घेतल्या होत्या. तो चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. तुषार देशपांडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो, त्याने रणजी ट्रॉफीमध्ये १०व्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतकही झळकावले आहे.

हेही वाचा – VIDEO : हार्दिक-अनन्याच्या डान्सवरून रियान पराग का होतोय ट्रोल? युजर्स म्हणाले, ‘असं काय आहे त्याच्यामध्ये…’

देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी –

२९ वर्षीय तुषार देशपांडेचा देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगला रेकॉर्ड आहे. त्याने ३६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ९७ विकेट्स, ४० लिस्ट ए सामन्यात ५१ विकेट्स आणि ८० टी-२० सामन्यात ११६ विकेट्स घेतले आहेत. आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची टीम इंडियात निवड झाली आहे. तुषार देशपांडेकडे नव्या चेंडूने विकेट घेण्याची क्षमता आहे.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन :

भारत : यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद.

झिम्बाब्वे: वेस्ली माधवेरे, तदिवनाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदंडे (यष्टीरक्षक), रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.

Story img Loader