IND vs ZIM 5thT20I Match Highlights: भारतीय संघाने झिम्बाब्वेविरूद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ अशा फरकाने जिंकली आहे. आज म्हणजेच १४ जुलैला झालेल्या पाचव्या टी-२० सामन्यात भारताने झिम्बाब्वेला ऑल आऊट करत ४२ धावांनी सामना जिंकला. पहिला सामना झिम्बाब्वेने जिंकल्यानंतर भारताच्या नव्या दमाच्या तरूण खेळाडूंनी सलग चार सामने जिंकत दणदणीत कमबॅक केले. या मालिकेत अनेक नव्या खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली. अभिषेक शर्मा, रियान पराग, तुषार देशपांडे, ध्रुव जुरेल यांना पदार्पणाची संधी मिळाली. सर्वच खेळाडूंनी त्यांच्या शानदार कामगिरीसह सर्वांनाच प्रभावित केलं. पण अभिषेक शर्माने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.

हेही वाचा – IND vs ZIM: एका चेंडूत १३ धावा! यशस्वी जैस्वालचा दुर्मिळ विक्रम, T20I च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

मालिकेतील पहिल्या सामन्यातच अभिषेक शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. आयपीएलमधील विस्फोटक फलंदाजी पाहता त्याला झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेसाठी संधी मिळाली. मात्र पहिल्याच सामन्यात तो शून्यावर बाद होत पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने आपल्या कौशल्याच्या जोरावर शानदार शतकी खेळी खेळली. आयपीएलमधील तोच विस्फोटक अंदाज त्याने झिम्बाब्वेच्या मैदानावर दाखवला. याशिवाय चौथ्या टी-२० सामन्यात अभिषेकला फलंदाजीची संधी मिळाली नाही, तरी त्याने चेंडूने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि एक विकेट घेतली.

हेही वाचा – Harbhajan Singh: “तुम्हाला खेळायचंय तर खेळा, आमचा संघ पाकिस्तानात पाठवणार नाही..”, लाइव्ह शोमध्ये हरभजन सिंग भडकला, VIDEO व्हायरल

अभिषेक शर्मा कपिल देव आणि लाला अमरनाथ यांच्या खास क्लबमध्ये सामील

एक शतक आणि १ विकेट यासह अभिषेकने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनोखा विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. ज्याने एकाच मालिकेत शतक झळकावण्याचा आणि विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. याबाबतीत, अभिषेक देखील सर्वकालीन महान खेळाडू लाला अमरनाथ आणि कपिल देव यांच्या विशेष क्लबचा भाग बनला आहे.

हेही वाचा – James Anderson: कोणासमोर गोलंदाजी करणं अवघड? ‘या’ दिग्गज भारतीय खेळाडूचं नाव घेत अँडरसन म्हणाला…

भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या सामन्यात शतक आणि विकेट घेणारे खेळाडू
लाला अमरनाथ – कसोटी (१९३३ मध्ये इंग्लंड विरुद्ध घरच्या मैदानावर ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत)

कपिल देव – एकदिवसीय (१९८३ एकदिवसीय विश्वचषक)

अभिषेक शर्मा – टी-२० आंतरराष्ट्रीय (२०२४ मधील भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा)