IND vs ZIM Best Fielder Medal Video: टी-२० चॅम्पियन ठरल्यानंतर भारताच्या युवा ब्रिगेडनेही विश्वचषकानंतरची पहिला टी-२० मालिका जिंकत विजयाने सुरूवात केली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने झिम्बाब्वेचा ४-१ असा पराभव करत मालिका आपल्या नावे केली. टी-२० विश्वचषकानंतर कोचिंग स्टाफ बदलला असला तरी परंपरा मात्र तशाच सुरू राहणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे झिम्बाब्वेविरूद्ध मालिकेतील बेस्ट फिल्डरचं मेडल देतानाचा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. पाहा कोणाला मिळालं बेस्ट फिल्डर मेडल?

हेही वाचा – Champions Trophy 2025: ‘भारतीय संघ पाकिस्तानात नाही आला तर…’, PCB ने BCCIला दिली धमकी?

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा
Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
Raosaheb Danave Beating Karyakarta
Raosaheb Danave Viral Video : फोटो फ्रेममध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी लाथाडलं; VIDEO व्हायरल!

भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममधील बेस्ट फिल्डर मेडलचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. यामध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक सुभदीप घोष यांनी मालिकेतील पदक विजेत्याची घोषणा केली. बेस्ट फिल्डर मेडलची घोषणा ही टी दिलीप यांच्याकडून नेहमी व्हायची त्यामुळे चाहत्यांनाही त्यांच्या आवाजाची सवय होती. त्यासाठी सुभदीप घोष यांनी माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांचा एक व्हिडिओ संदेश खेळाडूंना दाखवला.

हेही वाचा – IND vs ZIM: एका चेंडूत १३ धावा! यशस्वी जैस्वालचा दुर्मिळ विक्रम, T20I च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

यामध्ये टी दिलीप म्हणतात, “भारतीय क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणाला नेहमीच महत्त्व दिले गेले आहे. हा खेळाचा एक पैलू आहे जिथे आपण अनेक वर्षांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आपण या विभागात उत्कृष्ट कामगिरी करत राहण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. पदकांची क्षेत्ररक्षणाची परंपरा आपल्याला माहिती आहे. हे पदक आपल्या क्षेत्ररक्षणाने सामन्यावर चांगला परिणाम करणाऱ्या खेळाडूला दिले जाते.”

हेही वाचा – VIDEO: युवराज-हरभजन-रैनाने उडवली विक्की कौशलच्या ‘Tauba Tauba’ गाण्याची खिल्ली, भारतीय क्रिकेटर्सचा भयंकर डान्स पाहिला का?

यानंतर घोष यांनी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेदरम्यान भारतीय खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाबद्दल त्यांचे कौतुक केले. यानंतर त्याने रिंकू सिंगला मालिकेतील बेस्ट फिल्डरचे मेडल मिळाले. रिंकूला या दौऱ्यासाठी प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडून पदक मिळाले. यावेळी रिंकू सिंग म्हणाला, “मला सगळ्यांसोबत खेळायला मजा आली. ही माझी चौथी किंवा पाचवी मालिका होती. त्यामुळे मला खूप मजा आली. खरे सांगायचे तर मला फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खूप आवडते. मला खूप मजा येते. मग मी आणखी काय सांगू, बाकी सर्व गॉड्स प्लॅन.”

रिंकूने बेस्ट फिल्डरचे मेडल जिंकताच खेळाडूंनी त्याला खुर्चीवर उभं राहून मेडल जिंकल्याबद्दल चार शब्द बोलायला सांगितले. सुरूवातीला रिंकू लाजत होता पण त्याला जबरदस्ती करत उभं राहावंचं लागलं. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील हा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.