भारत आणि झिम्बाव्बेदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’ क्रिकेट मैदानावर झाला. पहिल्यांदा फलंदाजी करून यजमान संघाने ३८.१ षटकांमध्ये सर्वबाद १६१ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेले १६२ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने पाच गडी गमावून २५.५ षटकांमध्ये पार केले.

टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यात व्यस्त आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय क्रिकेटपटूंची चाहत्यांची प्रचंड क्रेझ आहे. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर चर्चेत वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. झिम्बाब्वेमध्ये एका महिला चाहतीला दीपक चहरची चांगलीच भुरळ पडली आहे. या चाहतीने दीपकला एक विनंती केली, त्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

पहिल्या सामन्यातील चहरच्या दमदार कामगिरीवर भारतीयच नाहीत तर झिम्बाब्वेमधील क्रिकेटप्रेमीही खुश होते. यानंतर हरारे क्रिकेट मैदानावर उपस्थित स्थानिक पत्रकार, मैदानावरील कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी या सर्वांना चहरला जवळून पाहायचे होते. त्याचवेळी झिम्बाब्वेच्या एका क्रिकेटरचे कुटुंबीय दीपकसह सेल्फी घेताना दिसले. सेल्फी घेतानाचा हा व्हिडीओ आता इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

IND vs ZIM: राष्ट्रगीत सुरू असताना मधमाशीने केला ईशान किशनवर हल्ला; बघा काय होती त्याची रिअ‍ॅक्शन

या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, या महिला चाहतीवर चहरची भुरळ पडली आहे. ती चाहरला सांगते की ‘तू खूप क्यूट आहेस, मी तुला स्पर्श करू शकतो का?’ यावर दीपक थोडा गोंधळला, मात्र नंतर त्याने होकार दिल्यावर ती चाहती त्याच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी घेताना दिसली. चहरसोबत सेल्फी घेणाऱ्या महिला चाहतीने सांगितले की, आम्हाला खूप आनंद झाला आहे. तो अतिशय गोंडस आणि सभ्य व्यक्ती आहे.

त्‍याचबरोबर चहरने सांगितले की, ‘एवढ्या मोठ्या कालावधीनंतर असा पाठिंबा मिळाल्याने मला आनंद होत आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रेरित करण्यासाठी चाहत्यांची गरज असते. इतके चाहते पाहून मला खूप आनंद झाला. कोविडच्या काळात आम्ही या चाहत्यांना खूप मिस केले होते.’

नवी कार खरेदी केल्यानंतर त्यानं मानले आधीच्या प्रेयसीचे आभार, जुना बॉस आणि भाजीवाल्यालाही म्हणाला ‘थँक यू’; पोस्ट व्हायरल!

दीपक चहरने झिम्बाब्वे दौऱ्याची शानदार सुरुवात केली. सहा महिन्यांनंतर दुखापतीतून सावरल्यानंतर टीम इंडियामध्ये परत आल्यावर त्याने धमाकेदार कामगिरी करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात २७ धावांत ३ बळी घेत ‘मॅन ऑफ द सीरीज’चा पुरस्कार पटकावला. मात्र, दीपक चहरला दुसऱ्या वनडेत विश्रांती देण्यात आली आहे.

दीपक चहरने झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी फेब्रुवारी २०२२ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून तो दुखापतींशी झुंज देत आहे. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर मैदानात परतलेला चहर पूर्ण जोमात दिसला.

Story img Loader