झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. आज म्हणजेच २२ ऑगस्ट रोजी हरारे येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात त्याने ९७ चेंडूत १३० धावांची शानदार खेळी खेळली. यावेळी गिलने १५ चौकार आणि एक षटकार मारला. हे शतक झळकावून त्याने सचिन तेंडुलकरचा २४ वर्ष जुना विक्रम मोडला आहे. हा रेकॉर्ड कोणता आहे ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शिखर धवन आणि केएल राहुलने डावाची सुरुवात केली. केएल राहुल ३० धावा करून बाद झाल्यानंतर शुबमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने सुरुवातीपासूनच चांगली खेळी खेळली. ८२ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपले पहिले शतक पूर्ण केले. शुबमन गिल आणि ईशान किशन जोडीने तिसऱ्या गड्यासाठी १२७ चेंडूत १४० धावांची भागीदारी केली.

IND vs ZIM: झिम्बाब्वेमधील महिला फॅनला पडली दीपक चहरची भुरळ; सामन्यादरम्यानच केली ‘ही’ विचित्र मागणी

झिम्बाब्वेमध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी खेळणारा शुभमन हा भारतीय फलंदाज ठरला आहे. हा विक्रम यापूर्वी तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने १९९८ मध्ये बुलावायो येथे नाबाद १२७ धावा केल्या होत्या. शुभमनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले आहे. याआधी त्याने कसोटीत चार अर्धशतके आणि एकदिवसीय सामन्यात तीन अर्धशतके नोंदवली होती.

हे महत्त्वपूर्ण शतक झळकावल्यानंतर गिल रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या खास क्लबमध्ये सामील झाला आहे. गिलच्या आधी रोहित आणि राहुलनेही झिम्बाब्वेमध्ये आपल्या कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. रोहितने २०१० मध्ये आणि राहुलने २०१६ मध्ये ही कामगिरी केली होती.

IND vs ZIM: राष्ट्रगीत सुरू असताना मधमाशीने केला ईशान किशनवर हल्ला; बघा काय होती त्याची रिअ‍ॅक्शन

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत गिलने तिसऱ्या क्रमांकावर शानदार फलंदाजी केली. सुरुवातीला आरामात फलंदाजी केल्यानंतर त्याने आपली सर्वोत्तम खेळी दाखवण्यास सुरुवात केली. विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर गिलने हे सिद्ध केले की तो भविष्यात या ऑर्डर खाली खेळू शकतो.

वेस्ट इंडीज दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत शुभमन गिलला शतक झळकावण्याची संधी होती. पावसाच्या व्यत्यय आलेल्या सामन्यात त्याने ९८ धावा केल्या होत्या. याशिवाय, २०२०-२१मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामन्यात तो ९१ धावांवर बाद झाला होता. त्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झाले नव्हते. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याने ही कसर भरून काढली.