IND vs ZIM T20I live Telecast: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. सुरूवातीचे तीन सामने झाले असून २-१ अशा गुणफरकाने भारतीय संघ आघाडीवर आहे. १२ जुलैला चौथा आणि १३ जुलैला पाचवा टी-२० सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यांकरता टी-२० विश्वचषक संघातील काही खेळाडूही झिम्बाब्वेला पोहोचले आहेत. पण भारत वि झिम्बाब्वे सामना लाइव्ह कुठे पाहता येणार, जाणून घ्या.

हेही वाचा – IND vs SL मालिकेचं वेळापत्रक जाहीर, प्रशिक्षक म्हणून गंभीर पर्वाला होणार सुरूवात; राहुल-हार्दिककडे कर्णधारपद?

IND vs ZIM मधील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला १३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने तब्बल १०० धावांनी मोठा विजय मिळवला. अभिषेक शर्माच्या ४६ चेंडूत शतकी खेळीमुळे भारताने दुसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने २३४ धावा केल्या आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. तर तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने २३ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने ६६ धावांची शानदार खेळी केली. तर गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदरने आपल्या फिरकीच्या तालावर झिम्बाब्वेच्या फलंदाजांना नाचवले. आवेश खान, खलील अहमद यांच्याकडूनही चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तर रवी बिश्नोईने टिपलेला झेल सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला होता. तिसऱ्या टी-२० सामन्यापासून टी-२० विश्वचषक संघातील खेळाडू संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा संघात समावेश झाला. यशस्वीने गिलबरोबर सलामीला उतरच चांगली सुरूवात करून दिली तर संजूनेही संघाच्या धावसंख्येत भर घातली.

हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…

IND vs ZIM टी-२० सामने लाइव्ह कुठे पाहता येणार?

भारत वि झिम्बाब्वे मालिकेतील सामन्यांचे लाइव्ह प्रक्षेपण जिओ किंवा हॉटस्टरवर पाहता येणार नाही. तर सोनी लिव अॅपवर या मालिकेतील लाइव्ह सामने पाहता येणार आहेत. तर सोनी स्पोर्ट्स या चॅनेलवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे. भारत आणि झिम्बाब्वेमध्ये आतापर्यंत १० टी-२० सामने खेळवले गेले आहेत. ज्यापैकी भारताने सात सामने जिंकले आहेत.

भारतीय संघ :
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.

हेही वाचा – Champions Trophy: भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही, BCCI ने ICC समोर मांडला नवा प्रस्ताव

झिम्बाब्वे संघ:
सिकंदर रझा (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, जोनाथन कॅम्पबेल, तेंडाई चतारा, ल्यूक जोंगवे, इनोसंट कैया, क्लाइव्ह मदांडे, वेस्ली मधेवेरे, तदिवनाशे मारुमनी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्रँडन मावुता, ब्लेसिंग मुजरबानी, डियोन मायर्स, एंटम नक्वी, रिचर्ड नगारवा, मिल्टन शुम्बा

Story img Loader