Yashasvi Jaiswal scored a double century : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने सलग दुसरे शतक झळकावले. यशस्वी जैस्वालने २३२ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. त्याने इंग्लंडविरुद्ध एका मालिकेत दुसऱ्यांदा द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. त्याचबरोबर या द्विशतकाच्या जोरावर त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. यानंतर भारताने ४ बाद ४३० धावा करून दुसरा डाव घोषित केला. अशाप्रकारे इंग्लंडला ५५७ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

यशस्वी जैस्वालने २३२ चेंडूचा सामना करताना १४ चौकार आणि ११ षटकार लगावले. विशेष म्हणजे त्याने जेम्स अँडरसनच्या एका षटकांत तीन षटकार ठोकले. त्याचबरोबर कसोटी सामन्यातील एका षटकात तीन षटकार मारणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे. याआधी एमएस धोनी, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि उमेश यादवने हा पराक्रम केला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

कसोटीतील एका षटकात तीन षटकार मारणारे भारतीय (२००२ पासून)

१.एमएस धोनी विरुद्ध डेव्ह मोहम्मद, सेंट जॉन्स २००६
२.एमएस धोनी विरुद्ध महंमद रफिक, मिरपूर २००७
३.रोहित शर्मा विरुद्ध डेन पीड, विझाग २०१९
४.हार्दिक पंड्या विरुद्ध मलिंदा पुष्पकुमारा, पल्लेकेले २०१७
५.उमेश यादव विरुद्ध जॉर्ज लिंडेस रांची २०१९
६.यशस्वी जैस्वाल विरुद्ध जेम्स अँडरसन, राजकोट २०२४

हेही वाचा – IL T20 2024 Final : निकोलस पूरनच्या वादळी खेळीच्या जोरावर एमआय एमिरेट्सने पटकावली ट्रॉफी, दुबईचा ४५ धावांनी धुव्वा

कसोटीतील एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज –

१२ यशस्वी जैस्वाल विरुद्ध इंग्लंड राजकोट २०२४*
१२ वसीम अक्रम विरुद्ध झिम्बाब्वे शेखूपुरा १९९६
११ एम हेडन विरुद्ध झिम्बाब्वे पर्थ २००३
११ एन ॲस्टल विरुद्ध इंग्लंड क्राइस्टचर्च २००२
११ बी मॅक्युलम विरुद्ध पाकिस्तान शारजाह २०१४
११ बी मॅक्युलम विरुद्ध श्रीलंका क्राइस्टचर्च २०१४
११ बी स्टोक्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका केप टाउन २०१६
११ कुसल मेंडिस विरुद्ध आयर्लंड गॅले २०२३

भारतासाठी दुसऱ्या डावात द्विशतक झळकावणारे फलंदाज –

२०३* एमएके पतौडी विरुद्ध इंग्लंड दिल्ली १९६४
२००* डी सरदेसाई विरुद्ध वेस्ट इंडिज मुंबई बीएस १९६५
२२० एस गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज पोर्ट ऑफ स्पेन १९७१
२२१ एस गावस्कर विरुद्ध इंग्लंड द ओव्हल १९७९
२८१ व्हीव्हीएस लक्ष्मण विरुद्ध ऑस्ट्रेलिया कोलकाता २००१
२१२ वसीम जाफर विरुद्ध वेस्ट इंडिज सेंट जॉन्स २००६
२००* यशस्वी जैस्वाल विरुद्ध इंग्लंड राजकोट २०२४

भारताने दुसरा डाव केला घोषित –

भारताने ४ बाद ४३० धावा करून दुसरा डाव घोषित केला. अशाप्रकारे इंग्लंडला ५५७ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारताने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या, तर इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर संपुष्टात आला होता. टीम इंडियाकडे १२६ धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात एकूण ४३० धावांची म्हणजेच ५५६ धावांची आघाडी झाली. यशस्वी जैस्वालने २३६ चेंडूत १४ चौकार आणि १२ षटकारांसह नाबाद २१४ राहिला. त्याचवेळी सर्फराझने ७२ चेंडूंत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६८ धावांची खेळी केली. दोघांमध्ये १५८ चेंडूत नाबाद १७२ धावांची तुफानी भागीदारी केली.

Story img Loader