India Women’s National Cricket Team vs Sri Lanka Women’s Match Scorecard: न्यूझीलंडविरुद्धचा मानहानीकारक पराभव आणि पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षपूर्ण विजयानंतर, टीम इंडियाने अखेर २०२४ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपला फॉर्म दाखवला आहे. भारताने टी-२० विश्वचषक २०२४ मधील सर्वात मोठी धावसंख्या उभारत श्रीलंकेचा दणदणीत पराभव केला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेला १०० धावांच्या ऑलआऊट करत ८२ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये साधारण कामगिरीमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या भारताने श्रीलंकेविरूद्ध सामन्यात चॅम्पियन संघासारखी कामगिरी करत आपला फॉर्म दाखवून दिला आहे. भारताने श्रीलंकेचा ८२ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकले आहे. भारताने न्यूझीलंड संघाला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारताची अफलातून फिल्डिंग आणि राधा यादवचे एकापेक्षा एक कमाल झेल

भारताने श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात तिन्ही विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत श्रीलंकेला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. पण या सामन्यात भारताच्या फिल्डिंगने सर्वांची मनं जिंकली. गेल्या २ सामन्यात भारताला क्षेत्ररक्षणात निराशेचा सामना करावा लागला आणि काही अतिशय सोपे झेल सुटले होते. पण यावेळी भारतीय क्षेत्ररक्षक मोठ्या तयारीनिशी उतरल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम राधा यादव, रेणुका सिंग आणि यष्टिरक्षक रिचा घोष यांनी उत्कृष्ट झेल टिपला. या सामन्यात टीम इंडियाने झेल पकडण्याची एकही संधी वाया घालवली नाही. यासह टीम इंडियाने काही महिन्यांपूर्वी आशिया कपच्या अंतिम फेरीत श्रीलंकेकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला.

भारताकडून गोलंदाजीत अरूंधती रेड्डी आणि आशा शोभना प्रत्येकी ३ विकेट घेतले. तर रेणुका सिंगने सुरूवातीच्या षटकांमध्ये २ विकेट्स मिळवले यानंतर श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी १ विकेट घेतली तर कर्णधार हरमनप्रीत कौरच्या जागी आलेल्या राधा यादवने आपल्या फिल्डिंगने तर कहर केला. राधाने ३ उत्कृष्ट झेल टिपले.

भारताची विस्फोटक फलंदाजी

भारतीय संघाने श्रीलंकेवरील मोठ्या विजयानंतर अ गटाच्या गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले आहे. तर ३ सामन्यांत २ सामने जिंकत +०.५७६ नेट रन रेट नोंदवला आहे.

टी-२० विश्वचषक २०२४ ची गुणतालिका