IND W vs AUS W T20 World Cup 2024 Scorecard: महिला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये टीम इंडिया आपला अखेरचा गट सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जात आहे, जो टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यापूर्वी भारतीय संघाला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावे लागले. म्हणजेच टीम इंडियाने टॉसच्या वेळी दिलेली प्लेइंग इलेव्हन टीम इंडियाला बदलावी लागली.

टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना सुरू होण्याच्या काही वेळापूर्वीच आशा शोभनाला सामन्यामधून बाहेर व्हावे लागले. आशाच्या जागी राधा यादवचा संघात समावेश करण्यात आला. सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे आशा शोभना या सामन्यातून बाहेर पडल्याचे समजले आहे. नाणेफेकीच्या वेळी टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये तिचे नाव होते. त्यामुळे राधा यादवला या सामन्यात उतरवण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची परवानगी आवश्यक होती. तर ऑस्ट्रेलियन संघाने त्याला मान्यता दिली आणि भारतीय संघाला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची संधी मिळाली.

Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Indian Cricket Team Creates History Becomes First Team To Score 5 T20I International Century in 2024 IND vs SA Tilak Varma
IND vs SA: तिलक वर्माच्या शतकासह भारतीय संघाने घडवला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ

हेही वाचा – IND W vs AUS W: भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरूद्ध किती धावांनी विजय आवश्यक? कसं आहे समीकरण

आशा शोभना ही टीम इंडियाच्या महत्त्वाच्या गोलंदाजांपैकी एक आहे. अशा स्थितीत तिची दुखापत टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकते. याआधी ती पहिल्या तीन सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होती. या काळात तिने एकूण ५ विकेट्स घेतल्या होत्या. आशा शोभनाने या स्पर्धेत आतापर्यंत ५.४१ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत.

हेही वाचा – IND-W vs AUS-W Live score : टीम इंडियाची दमदार गोलंदाजी, ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ परतला तंबूत

पण राधा यादवनेही आशा शोभनाच्या जागी चांगली कामगिरी केली आहे. राधा यादव एक उत्कृष्ट फिल्डर आहे. तिने श्रीलंकाविरूद्धच्या सामन्यात तीन उत्कृष्ट झेल टिपले आहेत. याशिवाय राधाने या सामन्यातही उत्कृष्ट झेल टिपत बेथ मुनीला झेलबाद केले. तर गोलंदाजीतही एक विकेट घेतली.

भारतीय महिला संघाची प्लेइंग इलेव्हन:

शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग.

ऑस्ट्रेलिया:

बेथ मूनी (यष्टीरक्षक), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), जॉर्जिया वेअरहॅम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट, डार्सी ब्राउन.