India W vs England W 1st Test: भारतीय महिला क्रिकेट संघाने मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धचा एकमेव कसोटी सामना ३४७ धावांनी जिंकला. हा सामना जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला. इंग्लंडला मायदेशात घरच्या मैदानावर पहिल्यांदाच कसोटीत पराभूत केले. भारतीय महिला संघाचा इंग्लंडविरुद्धचा हा एकूण तिसरा विजय आहे. यापूर्वी त्याने २००६ मध्ये टॉंटन आणि २०१४ मध्ये वर्म्सले येथे विजय मिळवला होता. त्याचवेळी महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात धावांच्या बाबतीत टीम इंडियाने सर्वात मोठा विजय मिळवला. यापूर्वी श्रीलंकेच्या महिला संघाने १९९८ मध्ये पाकिस्तानचा ३०९ धावांनी पराभव केला होता. न्यूझीलंडने १९७२ मध्ये दक्षिण आफ्रिकेवर १८८ धावांनी विजय मिळवला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय घडलं मॅचमध्ये?

पहिल्या डावात ४२८ धावा केल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या डावात १३६ धावांत गुंडाळले. अशा स्थितीत भारताकडे पहिल्या डावात २९२ धावांची मोठी आघाडी होती. टीम इंडियाने दुसरा डाव सहा विकेट्सच्या मोबदल्यात १८६ धावांवर घोषित केला. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी ४७९ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य मिळाले. भारतीय फिरकीपुढे अक्षरशः त्यांनी गुडघे टेकले, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. त्यांचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात अवघ्या १३१ धावांत गारद झाला. भारताकडून दीप्ती शर्माने चार आणि पूजा वस्त्राकरने तीन विकेट्स घेतल्या. राजेश्वरी गायकवाड यांना दोन यश मिळाले. रेणुका सिंह ठाकूरने एक विकेट घेतली.

पूजा आणि दीप्ती यांची दुसऱ्या डावात भेदक गोलंदाजी

दुसऱ्या डावात इंग्लंडला पहिला धक्का टॅमी ब्युमॉन्टच्या रूपाने बसला. २६ चेंडूत १७ धावा करून ती बाद झाली. रेणुका सिंगने तिला त्रिफळाचीत केले. त्यानंतर आलेल्या सोफिया डंकलेला १५ धावांवर बाद करत पूजा वस्त्राकरने तिला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डंकलेनंतर पूजाने नताली सीव्हर ब्रंटलाही आपली शिकार बनवले. नताली खाते न उघडताच त्रिफळाचीत झाली. तिच्यापाठोपाठ कर्णधार हैदर नाइटही बाद झाली. हैदर (२१ धावा) यास्तिका भाटियाच्या गोलंदाजीवर पूजा वस्त्राकरवी झेलबाद झाली. डॅनिएल व्याटही भारतीय फिरकीपुढे फारशी तग धरू शकली नाही, तिने केवळ १२ धावा केल्या. दीप्ती शर्माच्या चेंडूवर स्नेह राणाने तिचा झेल घेतला.

अ‍ॅमी जोन्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवत, दीप्ती शर्माने इंग्लंडला सहावा धक्का दिला. पाच धावा करून जोन्सला शफाली वर्माकरवी झेलबाद केले. तिच्यापाठोपा सोफी एक्लेस्टोनही बाद झाली. तिला फक्त १० धावा करता आल्या. एक्लेस्टोनला राजेश्वरी गायकवाडने त्रिफळाचीत केले. केट क्रॉस (१६ धावा) आणि लॉरेन फिलर (००) या दोघींना दीप्ती शर्माने त्रिफळाचीत करत इंग्लंडच्या आशा संपुष्टात आणल्या. गायकवाडने लॉरेन बेलला (८ धावा) जेमिमाहकरवी झेलबाद करून इंग्लंडचा डाव संपवला.

भारताचा दुसरा डाव

भारताच्या दुसऱ्या डावाबद्दल जर बोलायचे झाले तर कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक नाबाद ४४ धावा केल्या. तिला अर्धशतक झळकावण्याची संधी होती, पण तिने संघाला प्राधान्य देत डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. शफाली वर्मान ३३ आणि जेमिमाह रॉड्रिग्जने २७ धावा केल्या. स्मृती मानधना २६ आणि दीप्ती शर्माने २० धावा करत संघाच्या डावाला आकार दिला. पूजा वस्त्राकर १७ धावा करून नाबाद राहिली. यास्तिका भाटियाने ९ धावा केल्या तर स्नेह राणाला खातेही उघडता आले नाही. इंग्लंडतर्फे चार्ली डीनने चार आणि सोफी एक्लेस्टोनने दोन विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या दिवसाचा जेव्हा खेळ सुरू झाला तेव्हा भारताने ४१० धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. बेलने एक्लेस्टोनच्या हाती दीप्ती शर्मा झेलबाद झाली. तिने ६७ धावांच्या खेळीत त्याने १० चौकार आणि एक षटकार लगावला. ती बाद होताच भारताचा डाव संपुष्टात आला. रेणुका सिंग एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतली. इंग्लंडकडून लॉरेन बेल आणि सोफी एक्लेस्टोन यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर केट क्रॉस, नताली सीव्हर ब्रंट आणि चार्ली डीन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा: IND vs SA: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी-दीपक चाहरची दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार

इंग्लंडचा पहिला डाव

इंग्लंडच्या पहिल्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सोफिया डंकले आणि कर्णधार हीदर नाइट या दोघीही प्रत्येकी ११ धावा करून बाद झाल्या. डंकलीला रेणुकाने त्रिफळाचीत केले. तर हैदरला पूजा वस्त्राकरने पायचीत बाद केले. यानंतर टॅमी ब्युमॉंट आणि नताली सीव्हर ब्रंट यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. ब्युमॉन्ट १० धावा करून धावबाद झाली. यानंतर दीप्ती शर्माने डॅनियल व्याटला झेलबाद केले. तिला फक्त १९ धावा करता आल्या. यानंतर दीप्तीने इंग्लंडच्या डावातील ३०व्या षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या. पहिल्या जोन्सला शफाली वर्माकरवी झेलबाद केले. जोन्स १२ धावा करू शकली. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर एक्लेस्टोनला बाद केले. एक्लेस्टोनला खातेही उघडता आले नाही.

यानंतर स्नेह राणाने सीव्हर ब्रंटला त्रिफळाचीत केले. तिला ७० चेंडूत ५९ धावांच्या खेळीत १० चौकार मारता आले. यानंतर आलेल्या स्नेह राणाने चार्ली डीनला पायचीत करत इंग्लंडला चारीमुंड्या चीत केले. इंग्लंडचा डाव १३६ धावांवर आटोपला. भारताकडून दीप्ती शर्माने सात धावांत पाच विकेट्स घेतल्या. तर स्नेह राणाने दोन गडी विकेट्स घेत तिला मदत केली. रेणुका आणि पूजाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.