Jemimah Rodrigues Maiden ODI hundred : भारतीय महिला क्रिकेट संघाने राजकोटमध्ये जेमिमा रॉड्रिग्ज पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर इतिहास घडवला आहे. आयर्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने ५० षटकांत ५ गडी गमावून ३७० धावांचा डोंगर उभारला. महिला वनडेमधली ही भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी २०१७ मध्ये भारताने बडोद्यात आयर्लंडविरुद्ध दोन विकेट गमावून ३५८ धावा केल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महिलांच्या एकदिवसीय सामन्यातील ही एकूण १५ वी सर्वोच्च धावसंख्या आहे. महिलांच्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. न्यूझीलंडने २०१८ मध्ये डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्ध चार विकेट गमावून ४९१ धावा केल्या होत्या. महिलांच्या एकदिवसीय सामन्यातील पहिल्या चार सर्वोच्च धावा न्यूझीलंड महिला संघाच्या नावावर आहेत.

कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मानधना आणि प्रतिका यांनी पुन्हा एकदा टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली. मानधनाने ५४ चेंडूत १० चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७३ धावा केल्या तर प्रतिकाने ६१ चेंडूत आठ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ६७ धावांची स्फोटक खेळी केली. यानंतर हरलीन देओलनेही अर्धशतक झळकावले. तिने ८४ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने ८९ धावा केल्या.

हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा मेलबर्न कसोटीनंतर घेणार होता निवृत्ती; कोणामुळे बदलला निर्णय? जाणून घ्या

जेमिमाने सात वर्षांनी झळकावलं पहिलंवहिलं शतक –

यानंतर स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने शतकी खेळी साकारली. तिने ९१ चेंडूंचा सामना करताना ११२.०८ च्या स्ट्राइक रेटने १०२ धावा केल्या. यादरम्यान जेमिमा रॉड्रिग्जने १२ चौकार मारले. जेमिमा रॉड्रिग्सच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. तिने फेब्रुवारी २०१८ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात टी-२० सामन्याने केली होती. यानंतर, तिने १२ मार्च २०१८ रोजी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. म्हणजेच जेमिमा रॉड्रिग्जला तिचं पहिलं शतक झळकावायला जवळपास ७ वर्षे लागली.

हेही वाचा – Devajit Saikia : कोण आहेत देवजीत सैकिया? जय शाहांनंतर बीसीसीआयच्या सचिवपदी झाली निवड

टीम इंडियाने उभारली सर्वात मोठी धावसंख्या –

जेमिमाह रॉड्रिग्जच्या या खेळीमुळे टीम इंडियाने ५० षटकांत ५ विकेट्स गमावून ३७० धावांचा डोंगर उभारला केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाची आतापर्यंतची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. स्मृती मंधाना आणि प्रतिक रावलने पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारीही केली. ऋचा घोष पाच चेंडूत १० धावा करून बाद झाली. तेजल हसबनीस आणि सायली सातघरे प्रत्येकी दोन धावा करून नाबाद राहिल्या. आयर्लंडकडून ओरला प्रेंडरगास्ट आणि आर्लेन केलीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. जॉर्जिना डेम्पसीला एक विकेट मिळाली.