India W vs Ireland W T20 World Cup: महिला टी२० विश्वचषकात भारताचा शेवटचा गट सामना आयर्लंड विरुद्ध आहे. टीम इंडियासाठी हा सामना करा किंवा मरो आहे. जर त्यांनी येथे विजय मिळवला तर भारत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सहज प्रवेश करेल. त्याचवेळी टीम इंडियाचा पराभव झाल्यास त्यांच्या अडचणी वाढणार असून सेमीफायनल गाठण्यासाठी त्यांना नशिबाची साथ हवी आहे. आयर्लंडसाठी हा सामना केवळ सन्मानाची लढत आहे. हा संघ आपले सुरुवातीचे तीन सामने गमावून उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मात्र, आयर्लंडवर कोणतेही दडपण नसेल आणि संघाला भारताविरुद्ध विजय मिळवून विश्वचषकातील मोहीम संपवायची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसरीकडे, आयर्लंडचा संघ आधीच टी२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे आणि टीम इंडियाचाही खेळ खराब करू इच्छितो. या गटात ६ गुणांसह इंग्लंडने उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले असून दुसरा संघ बनण्याची घोडदौड अजूनही सुरू आहे. २०२३ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, संघ गोलंदाजी आणि फलंदाजीत चांगली कामगिरी करत आहे. हरमनप्रीतचा फॉर्म निश्चितच चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीत त्याला पुढे येऊन आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात जबाबदारी स्वीकारावी लागेल.

फलंदाजीत पूर्ण ताकद दिसली नाही

आयर्लंडविरुद्ध मोठा विजय नोंदवण्यासाठी भारतीय फलंदाजांना आक्रमक खेळ दाखवावा लागेल, विशेषत: कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सलामीवीर शफाली वर्मा, कारण या दोघांनाही आतापर्यंत एकही महत्त्वाची खेळी खेळता आलेली नाही. हरमनप्रीतने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये १६, ३३ आणि ४ धावा केल्या आहेत, जे तिच्या पातळीपेक्षा खूपच कमी आहे, तर शफालीने ३३, २८ आणि ८ धावांची इनिंग खेळली आहे.

हेही वाचा: IND vs AUS: केएल राहुलवर एवढी मेहेरबानी किती दिवस? सततच्या फ्लॉप शोनंतरही कोच राहुल द्रविडचा पाठिंबा, चाहत्यांचा संताप

संघाची युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋचा घोष ही भारतासाठी स्पर्धेत सर्वाधिक सातत्यपूर्ण फलंदाज ठरली असून तिने ३१, ४४ आणि नाबाद ४७ धावा केल्या आहेत. तिला ही लय आयर्लंडविरुद्ध सुरू ठेवायला आवडेल. मात्र, तिला वरच्या फळीकडून चांगल्या पाठिंब्याची आवश्यकता असेल जेणेकरून टीम इंडियाला मोठा अपसेट टाळता येईल.

रेणुका-दीप्ती मजबूत, इतरांना गोलंदाजीत सुधारणा करण्याची गरज

स्पर्धेतील काही भागात टीम इंडियाची गोलंदाजी चांगली राहिली आहे. मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंग, ज्याने इंग्लंडविरुद्ध १५ धावांत पाच बळी देऊन कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली होती, ती आयर्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल तर अनुभवी दीप्ती शर्मा ही भारताची आतापर्यंतची सर्वाधिक सातत्यपूर्ण गोलंदाज आहे. राजेश्वरी गायकवाडला आतापर्यंत तीन सामन्यांत एकही बळी घेता आलेला नाही. भारतीय संघाला त्याच्याकडून आणि पूजा वस्त्राकर आणि राधा यादव यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

हेही वाचा: Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह थेट खेळणार IPL! ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतून बाहेर, BCCIची करडी नजर

सामना, कधी, कुठे, कसा?

भारत आणि आयर्लंड यांच्यातील महिला टी२० विश्वचषक सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता खेळला जाईल. नाणेफेक संध्याकाळी ६ वाजता होईल. सामन्याचे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार होणार आहे.

संभाव्य प्लेईंग-११

भारत: शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), शिखा पांडे, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग.

आयर्लंड: एमी हंटर, गॅबी लुईस, ओरला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलेनी (कर्णधार), इमर रिचर्डसन, लुईस लिटल, मेरी वॉल्ड्रॉन (यष्टीरक्षक), लेह पॉल, आर्लेन केली, कारा मरे, जेन मॅग्वायर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind w vs ire w t20 wc india face ireland in do or die match know when and where to watch the match avw