Richa Ghosh Catch Video Viral IND W vs PAK W Match : महिला टी-२० विश्वचषक २०२४ चा सामना भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघामध्ये खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने पाकिस्तानचा ६ विकेट्सनी धुवा उडवला. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयानंतर तिचा संघ भारतासमोर अत्यंत कठीण परिस्थितीतून जाताना दिसला. पाकिस्तानी संघाची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. दरम्यान, भारतीय यष्टीरक्षक रिचा घोषने एक असा उत्कृष्ट झेल टिपला, ज्याने चाहत्यांना खूश केले, ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना खूप वेगाने धावा करत होती. आशा शोभनाच्या षटकात तिने लागोपाठ दोन चौकार मारले. यानंतरही तिला हे षटक आणखी मोठे करायचे होते. १४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आशा शोभनाने ऑफ स्टंपवर चेंडू टाकला. या चेंडूवर फातिमा सनाने तिची बॅट खूप वेगाने घुमवली केली, पण तिच्या बॅटचा चेंडूशी चांगला संपर्क होऊ शकला नाही आणि चेंडू बाहेरच्या काठावर आदळला. त्यानंतर रिचा घोषने उजवा हात बाहेर काढला आणि हवेत झेप मारली. ज्यामुळे चेंडू थेट तिच्या हातात अडकला. फातिमा सनाची विकेट टीम इंडियासाठी खूप मोठी होती. या सामन्यात ती खूप वेगाने धावा करत होती. रिचाच्या झेलने त्याने ८ चेंडूत केवळ १३ धावा केल्या होत्या.

रिचा घोषने एका हाताने उत्कृष्ट झेल घेतलेला व्हिडीओ –

भारताने उघडले विजयाचे खाते –

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाने चांगली सुरुवात केली होती. शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्यात चांगली भागीदारी झाली होती. यानंतर सादिया इक्बालने भारतीय उपकर्णधारला मानधनाला (७) बाद करत भारताला पहिला धक्का. त्यानंतर जेमिमाने शफालीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. शफालीला १२व्या षटकात आलियाच्या हाती ओमायमाने झेलबाद केल. ३२ धावांची इनिंग खेळून ती बाद झाली. तर जेमिमाने २३ धावा केल्या. या सामन्यात हरमनप्रीत सिंगने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मात्र, सामना जिंकण्यापूर्वीच तिला दुखापत झाल्याने २९ धावांवर माघरी परतली. यानंतर दीप्ती शर्मा आणि सजीवन सजना अनुक्रमे सात आणि चार धावांवर नाबाद राहत भारताला विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून फातिमा सनाने दोन तर सादिया आणि ओमाइमाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – रोहित फाफ डू प्लेसिसच्या जागी RCB चे नेतृत्त्व करणार का? एबी डिव्हिलियर्सने विराटचा उल्लेख करत दिले उत्तर

पाकिस्तानची फलंदाजी ठरली अपयशी –

तत्पूर्वी भारताविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानी फलंदाजी विशेष काही करू शकली नाही. या सामन्यात त्यांनी २० षटकात ८ गडी गमावून १०५ धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियासाठी अरुंधती रेड्डी आणि श्रेयंका पाटील हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरल्या. या सामन्यात अरुंधती रेड्डीने तीन तर श्रेयंका पाटीलने दोन विकेट्स घेतल्या.